महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : संकेत डुंगरवाल
पुणे : प्रत्येक तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यावसायिक बनायला हवय. नोकरी मागणारा बनण्यापेक्षा नोकरी देणार बना.
व्यवसाय करताना स्वतःची क्षमत, आवड, परिश्रमाची तयारी आहे का या गोष्टींचा विचार प्रत्येकाने करायला हवा असे मत प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी व्यक्त केले.
ग्रीन वर्ल्ड ग्रुप आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे ग्रीन वर्ल्ड युथ कौन्सिल 2024 चे आयोजन नर्हे येथील जाधवर शैक्षणिक संकुलाच्या सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमात लेखक गौतम कोतवाल यांनी लिहीलेल्या भरारी, आयडॉल ऑफ महाराष्ट्र, आयकॉन ऑफ महाराष्ट्र, अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींच्या यशोगाथा असणार्या तर माझी वसुंधरा अभियानात महाराष्ट्र शासनाने निवडलेल्या उत्कृष्ट काम केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा लेखाजोखा असणार्या माझी वसुंधरा अशा पाच पुस्तकांचं प्रकाशन व कवियत्री चित्रा बाविस्कर यांच्या मुक्तांगण या कवितासंग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं. अलीकडे सगळ्या जातींना आरक्षण दिले, तरी 90 टक्के तरुणांना नोक-या मिळणार नाहीत. आपली जात, धर्म आपल्याला जगवू शकत नाही, राजकीय पक्षापासून दूर राहूनच आपली हिंमत, व्यवसाय करण्याची इच्छा आपल्याला जगवू शकते. तसेच चित्रा बाविस्कर यांनी लिहीलेला मुक्तांगण हा कवितासंग्रह बालगोपाळांना भारतीय संस्कृतीचं दर्शन करून देईल असे मत जेष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले. प्रत्येक तरूणाने स्वतःला ओळखलं पाहीजे. कुठलिही गोष्ट करण्याचा निर्धार जेव्हा स्वतः कराल तेव्हाच यशस्वी व्हाल असे मत पनवेल महानगरपालिकेचे आयुक्तत गणेश देशमुख यांनी काढले आयुष्यात यशस्वी होण्यासाठी व्हीजन सर्वात महत्त्वाचं आहे असे डॉ. आरती सुर्यवंशी म्हणाल्या. याप्रसंगी युथ आयकॉन पुरस्काराने जनता बेकरीचे सुरज वाडेकर, कल्याण डोबिवली महानगर पालिका वनअधिक्षक संजय जाधव, उद्योजिका नंदाताई कासार, गोपीसन्स अटायर्स अॅन्ड लाईफस्टाईल प्रा. लि.चे डायरेक्टर राज मुछाल, आनंद अॅग्रो ग्रुपचे अध्यक्ष उद्धव अहिरे, कृषीनाथ ग्रीन एनर्जी प्रा. लि. अहमदनगरचे चेअरमन महेश करपे यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉसमॉस सहकारी बँक, ए-वन ग्रुप, जाधवर इन्स्टिटयूट, कोहीनूर ग्रुप हे होते.
