आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विश्वसंत पुष्करमुनीजी म. सा. यांची ११७ वी जन्मजयंती उत्साहात साजरी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 26, 2026
Spread the love

पुणे : प. पू. विश्वसंत श्री पुष्करमुनीजी म. सा. यांची ११७ वी जन्मजयंती कोंढवा येथील श्री गुरू पुष्कर साधना केंद्र (पुष्कर धाम) येथे रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) अत्यंत उत्साहपूर्ण, श्रद्धामय आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. संतांचे पावन सान्निध्य, मान्यवरांची उपस्थिती आणि मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या भाविकांमुळे संपूर्ण पुष्कर धाम परिसरात धार्मिक चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

या मंगलमय सोहळ्याला राष्ट्रसंत प. पू. श्री नरेशमुनीजी म. सा., प. पू. श्री शालिभद्रमुनीजी म. सा. आणि प. पू. मेघाश्रीजी म. सा. आदी संतांचे पावन सान्निध्य लाभले.

त्यांच्या उपस्थितीमुळे जन्मजयंती सोहळ्याला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले. या कार्यक्रमासाठी आयएएस अधिकारी आनंद भंडारी, पारसमल लुंकड, विजयकांत कोठारी, बाळासाहेब धोका, बादरमल बुरट, शेवंतीलाल लुंकड, भवरीलाल जीरावाला आणि प्रकाश लुंकड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याची शोभा अधिकच वाढली.