महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : समाज कल्याणचे ध्येय असलेल्या डोनेट फर्स्ट ग्रुपने यंदा स्त्री आरोग्य जागृतीचा उपक्रम हाती घेतला आहे.
अहमदनगर शहरातील बडीसाजण सभागृहात पुणे येथील वेद ब्रह्मा योग संस्थेच्या संस्थापिका राखी गुगळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. राखी सध्या महिलांचे आजार या विषयांवर पीएचडी चा अभ्यास करत आहेत.
मोनोपोज आणि पीसीओडी त्रासाने ग्रासलेल्या महिलांना त्यांनी मार्गदर्शन केले. मेनोपोज या विषयावर बोलताना बदललेली जीवनचर्या, खाण्याच्या आवडीनिवडी या सर्वांना दोष देत राखी गुगळे यांनी व्यवस्थित संतुलित आहार, योगा, व्यायाम या सगळ्यांना सर्वात सोपे आणि योग्य उपाय सुचविले.
दिवसभराच्या व्यस्त वेळेत जर स्त्रियांनी फक्त तीस मिनिटे स्वतः साठी दिली तर त्या एकदम आरोग्यमय जीवन जगू शकतात. स्वतःसाठी काहीतरी करण्याची वेळ अजून गेली नाहीये अशी प्रेरणा त्यांनी दिली.
डोनेट फर्स्ट सेमिनारला साडेतीनशे पेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदविला. सोबतच नगर शहरात कार्यरत असलेले जिजाऊ ग्रुप, स्मार्ट सखी ग्रुप मेंबर्सनी उत्सुर्फ प्रतिसाद नोंदविला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतली आणि स्त्री आरोग्याचे महत्व नगरच्या महिलांना पटवून दिले.
