महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भुम: तालुक्यातील नळी वडगाव फाटा येथील वृद्धाश्रमाचे संचालक हभप गहिनीनाथ लोखंडे महाराज यांचे रविवारी (दि.१८) सायंकाळी ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या या निधनाने वृद्धाश्रमातील अनेक वृद्ध व निराधार लोकांचा बाप गेला अशी भावना जनसामान्यातून व्यक्त केली जात आहे.
गहिनीनाथ महाराज व त्यांची पत्नी हे दोघे वृद्ध असतानाही त्यांनी भूम तालुक्यातील नळी वडगाव फाटा येथे श्री संत माऊली ज्ञानेश्वर सेवाभावी मंडळाच्या माध्यमातून वृद्धाश्रम चालू केला होता. ते भिक्षा मागून येथील वृद्धाश्रमातील लोकांचे संगोपन करत होते.
