7 लाखांचा मुददेमाल हस्तगत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या सराईत टोळीस अटक करण्यात बार्शी शहर पोलीसांना यश आले आहे.
करतारसिंग दुधानी (वय २४ वर्षे रा. छत्रपती शिवाजी महाराज चौक परळी जि.बिड) अक्षय पाडुळे (वय २९ वर्षे रा. विमाननगर लेन नं १३ सी रूम न ९१३ लोहगाव ता.हवेली) हमीद शेख (वय २३ वर्षे रा. रामटेकडी हडपसर ता हवेली जि.पुणे) जगजितसिंग उर्फ जगदिशसिंग दुधानी (वय ३२ वर्षे रा. छत्रपती शिवाजी महाराज चौक परळी जि.बिड) यांना अटक करण्यात आली. आरोपीकडुन ७ लाख 4 हजार २०० रूपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. फिर्यादी विनोद राउत (रा. विजेता बंगला लक्ष्मीनगर लातेर रोड बार्शी) व त्याचे कुटुंबीय रात्री घरी झोपले असताना अज्ञात चार व्यक्तींनी त्यांच्या घरात घुसून त्यांना हत्याराने डोक्यात जबर मारहाण केली.
त्यांच्या घरातील एकुण २७ ग्रॅम सोने व १२००० रोख रक्कम असा एकुण १,०६,५०० रूपयाचा मुददेमाल जबरीने चोरून घेऊन गेले.या गुन्हयाचा तपास महेश गळगटे तसेच पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखा करत होते.
या गुन्हयाच्या तपासामध्ये सी.सी.टी.व्ही. फुटेज व माहीतीच्या आधारे गुन्हयातील अज्ञात आरोपी निष्पन्न करण्यात आले. या गुन्हयातील आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून एक आरोपी फरार आहे.
यातील आरोपी करतारसिंग दुधानी याच्यावर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकुण १३ गुन्हे दाखल आहेत आरोपी अक्षय पाडुळे याच्यावर १५ गुन्हे, आरोपी जगजितसिंग दुधानी याच्यावर ८ गुन्हे दाखल आहेत असे एकुण ३६ गुन्हे दाखल आहेत.
या ही कामगिरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, व बार्शी शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस अंमलदार शैलेश चौगुले, रियाज शेख मनिष पवार, अंकुश जाधव, सचिन देशमुख, सचिन नितनात, अविनाश पवार, राहुल उदार, धनराज फत्तेपुरे रोहीत बागल, प्रल्हाद आकुलवार, मोहन कदम, शरद वाघमोडे, सचिन इसामियाँ तसेच रतन जाधव सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांनी केली आहे.
