आचार्य डॉ. लोकेश मुनीजी यांचे प्रतिपादन : सूर्यदत्त जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण
महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
या मान्यवरांचा झाला गौरव – अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांना ‘सूर्यरत्न – द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया’ पुरस्कार, ज्येष्ठ संगीतकार अनु मलिक, भारतीय शास्त्रीय संगीतकार उस्ताद तौफिक कुरेशी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील नितीनभाई देसाई, लेफ्ट. जनरल अशोक आंबरे, राजयोगी बीके डॉ. गंगाधर, होप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या अध्यक्षा अरुणा कटारा, व्हाईस ऍडमिरल सतीश घोरमाडे, उद्योजक डॉ. अरुण खन्ना, पटेल ब्रदर्स इंटरनॅशनलचे संस्थापक मफत पटेल, प्रकाश स्टील्सचे प्रकाश कानुगो, जनसेवा फाउंडेशनचे मीना शहा, न्यूट्री ऑर्गनायझेशनचे करणसिंह तोमर, श्रॉफ ग्रुपचे जयप्रकाश श्रॉफ, सामाजिक कार्यकर्त्या सीमा दाबके (दिव्यांग सेवा) यांना ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. प्रेरक वक्ते व अध्यात्मिक मार्गदर्शक गौर गोपालदास, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडिया, प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे, हिंदी साहित्यिका वंदना यादव, सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. रमेश रांका, साईधाम कँसर क्लिनिकचे डॉ. स्वप्नील माने, कैलास भेळचे शिवराज मिठारे, सामाजिक कार्यकर्ते सीए राज देशमुख, भारतीय वित्त अधिकारी क्रांती खोब्रागडे, विधिज्ञ ऍड. प्रताप परदेशी, सुरेश इंदू लेझर्सचे संचालक वर्धमान शहा, पोलीस अधिकारी वैभव निंबाळकर, अश्विनी डायग्नोस्टिकचे सुनंदा सोमाणी यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’, स्पिरिच्युअल कॉर्पोरेट ट्रेनर प्रा. डॉ. दिनेश गुप्ता, व्यंकटेश बिल्डकॉनचे चेअरमन अंकुश आसबे, सामाजिक कार्यकर्ते अली असगर देखानी यांना सूर्यदत्त राष्ट्रीय विशेष पुरस्कार, विन एज्युटेकच्या अध्यक्षा खुशबू राजपाल यांना ‘सूर्यदत्त नॅशनल यंग अचिव्हर अवॉर्ड’, अरिजित बॅनर्जी, वरुण बुद्धदेव, अरमान उभरानी यांना ‘सूर्यदत्त लिट्ल मास्टर नॅशनल अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.
