महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : येथील सुलाखे हायस्कूलची विद्यार्थिनी श्राविका जाधव हिने डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले.
बॉम्बे सायन्स टिसर्च असोसिएशन यांच्या वतीने आयोजित डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा इयत्ता सहावी व इयत्ता नववीमधील विद्यार्थ्यांसाठी देशभरातून घेतले जाते.
तीन टप्प्यात होणाऱ्या या परीक्षेत पहिला टप्प्यामध्ये लेखी परीक्षा घेऊन त्यातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दुसरा टप्प्यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन करण्यात येते.
याही टप्प्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या टप्प्यामध्ये कृती संशोधन (project) आणि मुलाखत (interview) घेण्यात येते या परीक्षेतील दोन्ही टप्प्यांमध्ये श्राविका जाधव हिने यश प्राप्त केलेले असून ती तिसऱ्या टप्प्यासाठी पात्र झालेली आहे.
तिला प्रशालेतील विज्ञान शिक्षक संतोष तोडकरी व तिचे पालक संपत जाधव ज्योती जाधव यांनी मार्गदर्शन केले. तिच्या या यशाबद्दल बार्शी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, सचिव व संचालकांनी अभिनंदन केले. प्रशालेचे प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर यांनी तिचा सत्कार केला.















