आरोपीना ४ तासात केले जेरबंद : शिवाजीनगर पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या कारणावरुन मारहाण करणाऱ्या आरोपींना ४ तासात जेरबंद करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे.
सुरजितसिंग जुनी (वय-२४ वर्षे, रा. पाटील इस्टेट) जयसिंग जुनी (वय-१९ वर्षे, रा. पाटील इस्टेट) व एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत रात्री भारत पेट्रोल पंप, मनपाजवळ, पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे चंद्रशेखर सांवत यांच्या नेतृत्वाखालील टीमला गुन्हेगारांना पकडण्याच्या सुचना देण्यात आल्या.
पेट्रोल पंपाचे मालक यांना बांबुने डोक्यावर मारहाण झाल्याने त्यांच्यावर तात्काळ वैदयकीय उपचार करण्यात आले. पेट्रोल पंपावरील कामगार (फिर्यादी) यांची तक्रार घेत तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे तीन अनोळखी आरोपींचा शोध घेण्यात आला.
गुन्हयातील आरोपींना मोटार सायकलसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता पंपावर पेट्रोल भरण्याच्या कारणावरुन मारहाण केल्याचे उघड झाले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ संदीप सिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग वसंत कुवर, यांच्या मार्गदर्शनाखाली बाजीराव नाईक, सविता सपकाळे, अजित बडे, पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे यांनी केली आहे.
