वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : टोळी प्रमुख गणेश ऊर्फ गुड्या पटेकर व त्याच्या ६ साथीदाराविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. ही कामगिरी वारजे माळवाडी पोलिसांनी केली.
अमरजित मुन्ना सिंग (वय २३ वर्षे रा. अचानक चौक, रामनगर, वारजे) रोहन चव्हाण (वय २५) शुमवेल ऊर्फ दाद्या गायकवाड (वय ३० वर्ष रा. विठ्ठल रुक्मीणी मंदिरासमोर, अचानक चौक, रामनगर, वारजे) यांना अटक करण्यात आली आहे. तर गणेश ऊर्फ गुड्या पटेकर याच्यासह एकुण ४ पाहिजे आरोपी आहेत. फिर्यादी हे घरी झोपलेले असताना घराच्या बाहेर दगड पडल्याचा आवाज आला.
त्यामुळे ते घरातुन बाहेर आले. त्यावेळी फिर्यादीचा मित्र बाबु चव्हाण यांना अचानक चौकातील अमरजीत मुन्नासिंग व रोहन चव्हाण हे गचंडी पकडून त्यांनी निलू सोलापूरे याला का मारहाण केली असे विचारत हाताने मारहाण करीत होते.
ती भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी व त्यांची आई भाऊ व बाबू चव्हाणची आई गेले असता निलू सोलापूरे, योगेश करंजकर यांनी तुम्ही आमच्यामध्ये का येता असे म्हणत फिर्यादीच्या कपाळावर वीट मारून गंभीर जखमी केले. तसेच तेथे जमलेल्या लोकांना वाईट शिवीगाळ करुन, फिर्यादीस तुला उद्याचा सुर्य बघू देणार नाही अशी धमकी दिली.
दगडफेक करुन, लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करुन जमलेल्या लोकांवर हत्यारे उगारून दहशत निर्माण केली. म्हणून फिर्यादी यांनी वारजे माळवाडी येथे गुन्हा नोंदविला. गुन्हयातील गणेश ऊर्फ गुड्या पटेकर यांने आपल्या अधिपत्याखाली प्रत्येक गुन्ह्यात सामाईक साथीदार व नवीन साथीदार यांना सोबत घेऊन स्वतःची संघटीत टोळी तयार केली.
त्यांनी अपराध केलेले असून यातील आरोपी यांनी खुन, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करुन तोडफोड करणे, बेकायदेशीर शस्त्र जवळ बाळगणे, अपहरण करणे, जबरी चोरी करणे, पोलीसांच्या आदेशाचा भंग करणे, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे यासारखे गंभीर गुन्हे वारंवार केले आहेत. त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.
गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, भिमराव टेळे हे करीत आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रविण पवार, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण पाटील, पोलीस उप आयुक्त परि ३ संभाजी कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, निगराणी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मंदार शिंदे, तसेच पोलीस अमंलदार अतुल भिंगारदिवे, रामदास गोणते, गोविंद फड, किरण तळेकर, विजय खिलारी व नितीन कातुर्डे यांनी केलेली आहे.
मोक्का अंतर्गत केलेली ही १६ वी कारवाई आहे.
