महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल
पुणे : जितो पिंपरी चिंचवड चॅप्टरच्या वतीने 31 मार्च 2024 रोजी अहिंसा रॅली आयोजन करण्यात आले होते. भगवान महावीरांनी दिलेला अहिंसेचा संदेश सर्वापर्यत पोहचावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये ७०० नागरिक धावले.
रविवारी 31 मार्च 2024 रोजी चिंचवड पवना नगर येथील जैन शिक्षण प्रसारक मंडळाचे मैदान येथून या अहिंसा रॅलीचा प्रारंभ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहाय्यक पो. आयुक्त खेळाडू मनोहर जोशी, जैन प्रसारक मंडळाचे सचिव राजेंद्र मुथा, आय आय एफ एलचे सुनील सोनवळे, उद्योजक जिगर व्यास, स्मिता व्यास, अमुल दुधाचे रिजनल हेड संदीप नंदा, जीतो सल्लागार समितीचे संतोष धोका, तृप्ती कर्नावट, नवनीत बोरा, संतोष संचेती यांच्या सह जितोचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मनोहर जोशी यावेळी म्हणाले कि, या रॅलीमध्ये मी प्रथमच धावलो. स्पर्धेत सहभागी व्हायचे असते कारण आपली कितपत कार्यक्षम आहोत याची जाणीव होते. यामुळे आपल्याला किती मेहनत घ्यायची याचा अंदाज येतो. केवळ बक्षीसासाठी स्पर्धेत सहभागी व्हायचे नसते. अनुभव घेण्यासाठी स्पर्धेत सहभागी झाले पाहिजेत.
बिजलीनगर – भेळ चौक- लाल बहादुरशास्त्री चौक – निगडीतील कृष्णा हॉटेल पर्यंत पुन्हा याच मार्गाने चिंचवडच्या जैन शाळा मैदान या मार्गाने हि मॅरेथॉन झाली. १० किमी, ५ किमी, ३ किमी या तीन गटात हि मॅरेथॉन संपन्न झाली. अहिंसा आणि शांतीचा संदेश देण्यासाठी देशातील ६८ तर विदेशातील जितोच्या २७ चॅप्टरने आयोजित केलेल्या या मॅरेथॉनची गिनीज बुक ऑफ़ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.
या मॅरेथॉनमध्ये सातशे नागरीक धावले. अशी माहिती जितो पिंपरी चिंचवड चॅप्टरचे मुख्य सचिव योगेश बाफना यांनी दिली. यावेळी कॉर्फबॉल स्पर्धेत विजेत्या ७ खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या मॅरेथॉनला ज्येष्ठ नागरिक व महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जितो पिंपरी चिंचवड चॅप्टरचे अध्यक्ष मनिष ओसवाल, मुख्य सचिव योगेश बाफना, खजिनदार संतोष संचेती, सह खजिनदार नवनीत बोरा, जितो महिला विंगच्या अध्यक्षा वैशाली बाफना, सचिव योगिता लुंकड, खजिनदार सारिका सोलंकी, जितो पिंपरी चिंचवड चॅप्टरचे युवा अध्यक्ष सौरभ बेदमुथा, सचिव प्रणव खाबिया, खजिनदार पुष्पक जैन, महावीर जैन आदिंनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन मुकुल मोरे, यांनी तर आभार योगीता लुंकड यांनी मानले.
