महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : देशभरात लोकशाहीचा उत्सव सुरु असून, येत्या मंगळवारी (१३ मे) पुण्यासह देशाच्या अन्य भागात मतदान होत आहे. सक्षम व सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करणे महत्वाचे आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यभरात मतदानाचा टक्का वाढवण्याकरिता मतदान जनजागृती अभियान राबविले जात असून, विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्यालाच अनुसरून पुण्यातील नामांकित शिक्षण संस्था सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून मतदान जागृती केली.
बालगंधर्व चौकातील राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ, तसेच संभाजी उद्यानाच्या गेटजवळ विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत पुणेकरांना मतदान करण्याचे आवाहन केले. यासह हातात धरलेले फलक, पोस्टर यातूनही मतदानाचे महत्व सांगणारे संदेश देण्यात आले.
मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’,’चला मतदान करूया देशाची प्रगती घडवूया’, ‘मतदानाचा अभिमान, लोकशाहीची शान’, ‘उंगली पर काला निशाण, समजदार नागरिक की पेहचान’,’लोकतंत्र होगा तभी महान, हम सब करेंगे मतदान’, ‘वोट हमारा है अनमोल, कभी न लेंगे इसका मोल’, ‘वोट कर पुणेकर’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, प्राचार्य डॉ. मिथिलेश विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्राध्यापक मोनिका सेहरावत यांच्या पुढाकारातून विद्यार्थी व शिक्षक मतदान जागृती करीत आहेत. राजेंद्र पालवे यांनी या पथनाट्याचे लेखन-दिग्दर्शन केले. संस्थेतील ३०-३५ विद्यार्थी, शिक्षकांचा समूहाने यामध्ये भाग घेतला. पथनाट्य, फलक, पोस्टर याद्वारे मतदान करण्याबाबत जागृती केली जात आहे.
