महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : बार्शी तालुक्यातील रस्तापूर गावामध्ये एका युवकाने एका महिलेचा शेतात बळजबरीने विनयभंग केला आहे. या प्रकरणी अतुल राजा भोसले, (वय 28 वर्षे) याला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादीच्या घराच्या जवळ रहाण्यास असलेला जवळच्याच नात्यातील अतुल भोसले हा युवक शेळया चारण्याकरीता घराच्या जवळ गेले होते. यावेळी फिर्यादीने उन्हाच्या तडक्यामुळे बागडे यांचे शेतातील आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घेतली.
आरोपीने तिथे येवुन दमदाटी शिवीगाळी करून जबरदस्तीने विनयभंग केला. कुणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या मुलांना जीवे मारतो अशी फिर्यादीस धमकी दिली. बार्शी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील सदरील आरोपीस बार्शी तालुका पोलिसांकडून तातडीने अटक करण्यात आली आहे. बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अधिकारी म्हणून दत्तात्रय भालेराव पुढील तपास करत आहेत.















