बार्शीत स्नेहमेळावा : जुन्या आठवणींना उजाळा देत उलगडला एकमेकांचा प्रवास
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : येथील सुलाखे हायस्कूल शाळेतील रविवारी (ता. १२) रोजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. हा मेळावा सध्याचा नव्हे तर तब्बल २१ वर्षांपूर्वीच्या दहावीतील बॅचचा होता.
२००३ रोजी हे दहावीची बॅच शालेय जीवन संपल्याने आपापल्या वाटेने निघून गेले. कोणी अधिकारी झाले कोणी उद्योग – व्यवसायात स्थिरावले. कोणी शेतीत स्वतःला झोकून दिले. काळाच्या ओघात लग्न झाले.
मुलेबाळे झाली. मग त्यांचे शिक्षण, करिअर, कुटुंबासाठीच्या जबाबदाऱ्या पार पाडताना २१ वर्षे भुर्कन निघून गेली. हे १४५ विद्यार्थी आता मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. रुक्मिणी लॉन्स येथे हा मेळावा घेण्यात आला.
सदर कार्यक्रमास विद्यार्थी व विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलानाने करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत व शाळेचे ध्वज गीत म्हणून सुरुवात झाली. मन्मथ पावले यांनी हा स्नेह मेळाव्या बद्दल माहिती देत शाळेतील शिक्षणाचा व मित्रांचा आयुष्यात कसा फायदा झाला याविषयी मनोगत व्यक्त.
सर्वांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा देत आत्तापयर्यंतचा आपापला प्रवास उलगडून दाखविला. त्या नंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मन्मथ पावले, आनंद रुद्राके, रोहन जाजू, सुजित बेदमुथा, सागर लोढा,अमित बगले,पल्लवी धुमाळ, शीतल क्षीरसागर, अमृता झाडे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुधिर कटारे व कोमल मुनोत यांनी केले.
