गुन्हे शाखेची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : ज्वेलर्स दुकानावरील दरोडा टाकणाऱ्या टोळीला १२ तासाच्या आत जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.
सनी ऊर्फ योगेश पवळे,( वय २० वर्षे, रा.ए.आर.ए. आय. रोड, वसंतनगर, खडकेश्वर मित्र मंडळाजवळ, केळेवाडी, पौड रोड, कोथरुड) सनी ऊर्फ आदित्य गाडे, (वय १९ वर्षे ), पियुष केदारी,( वय १८ वर्षे, रा. स.नं. १०३, जयप्रकाश नगर, माऊली चौक, डॉन बॉस्को हायस्कुल समोर, येरवडा) ओमकार ऊर्फ ओम्या वाल्हेकर,(वय १९ वर्षे, रा. जयभवानीनगर, कोथरुड) नारायण ऊर्फ नारु गवळी, (वय २० वर्षे, रा. टिळेकर नगर, इस्कॉन मंदिराजवळ, कोंढवा रोड, कात्रज,) मयुर पटेल, ( वय ५३ वर्षे, रा. स.नं. १४, प्लॉट नं. ६, लोकरे बिल्डींग, फ्लॅट नं. १, कामधेनु पार्क शेजारी, वानवडी,) नासिर शेख, ( वय ३२ वर्षे, रा. घर नं. ३१६, चांभारवाडा, वानवडी) यांना अटक करण्यात आली आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून ६०१.१५ ग्रॅम वजनाचे सोने, २ दुचाकी, १ चारचाकी व ६ मोबाईल असा एकूण ४८,३०,९१० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. BJS ज्वेलर्स नावाचे मॅजेस्टिक मेमरीज सोसायटी तळमजला महमंदवाडी पुणे येथे गाळा नं.५३ येथे सोन्या-चांदीच्या दुकानावर ५/६ दरोडेखोरांनी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने रिव्हॉल्वर, लोखंडी रॉड व स्प्रे याचा धाक दाखविला.
तसेच दुकानातील अंदाजे ३०० ग्रॅम वजनाचे तयार सोन्याचे दागीने चोरी करुन पळून गेले. त्याप्रमाणे वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर पोलीस आयुक्त यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या.
अपर पोलीस आयुक्त, गुन्हे व पोलीस उप आयुक्त, गुन्हे यांच्या सुचनेप्रमाणे तसेच सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ व २ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील युनिट ४, ५, ६, खंडणी विरोधी पथक १ व २, दरोडा व वाहन चोरी पथक २ कडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांची १० पथके तयार करून समांतर तपास करण्यात आला.
पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तपासाच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा गुन्हा आरोपींनी केला असल्याचे सिद्ध झाल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
चौकशी केली असता त्यांनी इतर ३ साथीदार यांच्या मदतीने महंमदवाडी येथील BJS ज्वेलर्स दुकानात जाऊन दुकानात असलेल्या व्यक्तींना चाकु व रिव्हॉल्वरची भिती दाखवुन त्यांना मारहाण करुन त्यांचे दुकानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरुन आणले असल्याचे सांगितले.
ही कारवाई पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सतीश गोवेकर, सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, खंडणी विरोधी पथक २, अजय वाघमारे, दरोडा व वाहनचोरी पथक २, उल्हास कदम, युनिट ६. क्रांतीकुमार पाटील, खंडणी विरोधी पथक यांच्या मार्गदर्शनाखाली विजयकुमार शिंदे, शिवदास लहाने, अविनाश लोहोटे, श्रीकांत चव्हाण, यशवंत ओंबासे पोलीस अंमलदार अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, मयुर भोकरे, सयाजी चव्हाण, अशोक शेलार, अमोल सरतापे, चेतन शिरोळकर, राहूल इंगळे, विनायक येवले, सुरेद्र जगदाळे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, दिलीप गोरे, खरात, पवण भोसले, विनोद शिवले, अश्रुबा मोराळे, राजस शेख, प्रमोद टिळेकर, अमित कांबळे, दाऊद सय्यद, माऊली गिरमकर, सुदेश सपंकाळ, सुरेश जाधव, शिरीष गोसावी, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, बाळासाहेब सकटे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, राहूल ढमढेरे, अकबर शेख, प्रविण ढमाळ, शहाजी काळे, रविंद्र फुलपगारे, अमर पवार, यांनी केली आहे.
