महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : कारागृह व पोलीस विभागातील तीन वरीष्ठ अधिकाऱ्यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ पार पडला.
महाराष्ट्र शासनाच्या सेवेतुन ३१ मे रोजी कारागृह व पोलीस विभागातील सेवानिवृत्त होणाऱ्या तीन वरीष्ठ अधिकाऱ्यांचा भव्य सेवापुर्तीचा सत्कार समारंभ २२ मे रोजी कै. दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.
या समारंभामध्ये सेवानिवृत्त होणारे कारागृह विभागातील वरीष्ठ दर्जाचे अधिकारी कारागृह उपमहानिरीक्षक, मध्य विभाग, संभाजीनगन उमाजी पवार, अधीक्षक, रत्नागिरी विशेष कारागृह अंकुश सदाफुले, तसेच पोलीस विभागाचे उपअधीक्षक, दक्षता पथक, कारागृह मुख्यालय, अरुण सावंत, या अधिकाऱ्यांचा समावेश होता.
सेवानिवृत्तीच्या समारंभामध्ये अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते तीनही अधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला आहे.
या प्रसंगी अमिताभ गुप्ता यांनी मनोगत व्यक्त करताना शासकीय सेवेतुन सेवानिवृत्त होणा-या या तीन अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे सेवा केली व त्याच बरोबर पोलीस व कारागृह सेवेसारख्या ताणतणावाचे सेवेमध्ये देखील आरोग्य चांगल्या प्रकारे राखुन काम केले याचे कौतुक केले. तसेच यापुढे देखील त्यांचे आरोग्य चांगले राहो व त्यांचे वैयक्तीक इच्छा पुर्ण होवो अशा शुभेच्छा दिल्या.
त्याचबरोबर, समारंभास उपस्थित असणारे कारागृह विभागातील वरीष्ठ अधिकारी कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग स्वाती साठे, उपमहानिरीक्षक, दक्षिण विभाग, मुंबई योगेश देसाई, यांनी देखील पवार, सदाफुले, सांवत यांचे बरोबर एकत्रित केलेल्या कर्तव्याच्या गतकाळातील चांगल्या प्रंसगाच्या आठवणी सांगुन उपस्थितांना भाऊक केले व इतरांनी देखील त्यांच्या सेवेतुन प्रेरणा घ्यावी असे उपस्थितांना आवाहन केले.
या समारंभास प्राचार्य नितीन वायचळ, तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा दौलतराव जाधव यांच्यासह महाराष्ट्र कारागृह विभागातील इतर कारागृह अधिकारी व कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन वरीष्ठ तुरुंगाधिकारी नागेश पाटील यांनी केले.
