महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरातून मोटारसायकली चोरणाऱ्या रेकार्डवरील चोरट्यास पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
त्याच्याकडून जा सुमारे ९० हजाराच्या ४ गाड्या जपत करण्यात आल्या आहेत. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी, सोबत पथकाकडील अधिकारी बंडगार्डन पोलीस स्टेशन गुन्ह्यातील मोटार सायकल व आरोपी याचा सी.सी.टि.व्ही. फुटेज, आरोपीचे नातेवाईक यांचे मोबाईल नंबरचे तांत्रिक तपासाव्दारे शोध घेत असताना, समर्थ पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये मोटार सायकल चोरीतील रेकॉर्डवरील आरोपी विष्णु भाऊराव कुंडगीर (वय २५ वर्षे, रा. सध्या पुणे फिरस्ता व मुळगाव खेर्डा, तालुका उदगीर, जिल्हा लातुर) हा त्याचे ताब्यात हिरो होंडा स्प्लेंन्डर मोटार सायकलसह मिळुन आला.
त्याचेकडे चौकशी केली असता त्याने ती मोटार सायकल पोलीस आयुक्त कार्यालय, सेंट पॉल चर्च बाहेरील असलेल्या सार्वजनिक रोडचे पार्किंग मधुन चोरी केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता त्याने आणखी मोटार सायकली चोरी केल्याचे सांगितले आहे.
त्याचे कडुन बंडगार्डन पोलीस स्टेशन, कडील ०४, हडपसर पोलीस स्टेशन, कडील ०१ व भोसरी पोलीस स्टेशन, ०१ असे गुन्हे उघडकीस आले असुन एकुण ९०,०००/- रु किं च्या एकुण ०४ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
सदर आरोपी हिरो होंडा स्प्लेंन्डर गाडयांचे हॅन्डल लॉक हे बनावट चावीचा वापर करुन स्विच ऑन करुन त्या चोरी करुन घेवुन जात होता व त्यातील पेट्रोल संपल्यानंतर ती गाडी सदर ठिकाणी सोडुन तेथील दुसरी मोटार सायकल चोरी करुन घेवुन जात होता.
तसेच सदरच्या मोटार सायकली ह्या केडगाव रेल्वे स्टेशन जवळ, तालुका दौंड व फुरसुंगी येथील सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी त्या लावल्या होत्या. तसेच त्याचेवर सन २०१८ पासुन एकुण १५ वाहनचोरी गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त, गुन्हे अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १ सुनिल तांबे, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांचे मार्गदर्शनाखाली श्रेणी. पोलीस उप निरीक्षक शाहीद शेख, पोलीस अंमलदार चंद्रकांत जाधव, धनंजय ताजणे, गणेश ढगे, बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, रविंद्र लोखंडे, श्रीकांत दगडे, सुमित ताकपेरे, शिवाजी सातपुते, महेश पाटील, साईकुमार कारके व नारायण बनकर यांनी केली.
