महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : अश्वि ता. संगमनेर येथे मुमुक्षू प्रतिक्षा भंडारी जैन भगवती दिक्षा समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.
आश्वि येथील सुशील भंडारी यांची इंजिनिअर कन्या मुमुक्षु प्रतीक्षा भंडारी हि प.पू. आचार्य सम्राट राष्ट्रसंत आनंदऋषीजी म.सा. यांच्या आशीर्वादाने आणि प.पू. जिन शासन गौरव प.पू. सुनंदाजी म.सा. यांच्या प्रेरणेने जैन भगवती दिक्षा घेणार आहे.
दिक्षा समारोह रविवार दिनांक ९ जून रोजी सकाळी ८:३० वाजता अश्वी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे होणार आहे. त्यानिमित्ताने दीक्षा महोत्सव प्रारंभ बुधवार ५ जून रोजी झाला असून शनिवार दिनांक ८ जून रोजी केशर छाटणा, तसेच सकाळी ८:३० वाजता वरघोडा, सायंकाळी ७:३० वाजता भक्ती संध्या (मेहुल रूपडा, दर्शीत गादीया), कुंकुम, रक्षाबंधन, मेहेंदी असे विविध कार्यक्रम ४ दिवसात होणार आहेत.
अर्हम विजाप्रणेता उपाध्याय प्रवर प.पू. प्रवीणऋषीजी म.सा., प्रखर व्याख्याता प.पू. लोकेशऋषीजी म.सा., मधुरकंठी आतापणा साधक प.पू. तीर्थेशऋषिजी म.सा., उपप्रवर्तिनी साध्वीरत्ना प.पू. संन्मतिजी म.सा., वाणीभूषण प.पू. प्रीतीसुधाजी म.सा., कैवल्यधाम प्रेरक प.पू. कैवल्यरत्नाश्रीजी म.सा., स्वाध्याय प्रेमी प.पू. प्रियदर्शनाची म.सा., मधुरव्याख्याता प.पू. विश्वदर्शनाची म.सा., सतत उद्यमी प.पू. सुचेताजी म.सा., सेवाभावी विदुषी प.पू. कीर्तीसुधाजी म.सा., मधुर व्याख्याता प. पू. सुनिताजी म.सा., मधुर व्याख्याता प.पू. श्री ज्ञानप्रभाजी म.सा., विद्याबिलासी प.पू. श्री सुप्रियाजी म. सा., राजस्थान विरांगणा प.पू. जयश्रीजी म.सा., प्रखर वक्ता प.पू. सुप्रभाजी म.सा., उपप्रवर्तिनी प.पू. चंदनबालाजी म.सा., प्रतिभाशाली प.पू. शुभदाजी म.सा., बुलंदवाणी प.पू. पद्मावतीजी म.सा., अध्ययनप्रेमी प.पू. सुबोधिजी म.सा., सतत उत्साही प.पू. सुवीज्ञाजी म.सा., स्वाध्याय प्रेमी प.पू. सुजिज्ञा म.सा., प.पू. भारवी, म.सा., नवदीक्षिता प.पू. समृद्धी म.सा. आदी साधू संतांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
या दीक्षा समारोहाचे उत्कृष्ट नियोजन श्रावक संघ अध्यक्ष सुमतीलाल गांधी, उपाध्यक्ष ईश्वरलाल भंडारी, सचिव प्रकाशलाल मुथा, खजिनदार वसंतलाल गांधी, संतोष भंडारी, किशोर पटवा, योगेश रातडीया, अभिजीत गांधी, दिलीप पटवा, किशोर पटवा, मिलींद बोरा, संजय गांधी आदि करत आहेत.तसेच गौतम गांधी, निलेश रातडीया, नितीन गांधी, निलेश चोपडा, अमित भंडारी, दीपक बोरा, रोहित भंडारी, प्रीतम गांधी, राजेन्द्र भंडारी, समीर गांधी, प्रशांत गांधी, आश्विन मुथा, मनोज पटवा, किरण गांधी, पंकज नाके, मंगेश रासने, पपलेश लाहोटी, बजरंग ढगे, चांगदेव खेमनर आदी जैन युवक गेल्या २ महिन्यापासून परिश्रम घेत आहेत.
दीक्षा समारंभासाठी नवकार ग्रुप, युवक मंडळ, महिला मंडळ, बहु मंडळ, कन्या मंडळ, आनंद पाठशाळा, बालक एवम् बालिका मंडळ, भारतीय जैन संघटना आश्वी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर हे सर्व परिश्रम घेत असल्याची महिती अश्वी जैन संघाचे सुमतीलाल गांधी व ईश्वर भंडारी यांनी दिली आहे.
