महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : श्री जैन श्वेतांबर दादावाडी मंदिर येथे प. पू. डॉ मुनीराज श्री लाभेशविजयजी महाराज व प. पू. मुनिराज ललितेशविजयजी महाराज यांचा भव्य दिव्य मंगल प्रवेश संपन्न झाला. मित्रमंडळ चौक येथून गुरुभगवंतांची वाजत गाजत भव्य शोभायात्रा ची सुरवात करून सारसबाग समोरील जैन श्वेतांबर दादावाडी मंदिर येथे समारोप करण्यात आले.
जैन बांधव केशरी फेटा व जैनम जयति शासनमचा जैन दुपट्टा परिधान करत तर महिला मंडळांनी रंगबीरंगी साडीत डोक्यांवर कळस घेऊन या शोभायात्रेत सहभागी झाले होते. बँड पथक द्वारे व ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
या चातुर्मासात प्रत्येक पूर्णिमेला महाअभिषेक तर सामूहिक जप, तर महामांगलिक प्रवचनचे आयोजन करण्यात येणार आहे. मंदिराबाहेर महिलांनी डोक्यांवर कळस घेऊन गुरुभगवंतांचे परिक्रमा करत तांदूळ उधळून भव्य स्वागत केले.
दीपचंद सोहनराज कटारिया यांच्या हस्ते गुरुभगवंतांना कांबळी देऊन बहुमान करण्यात आले, नितीन जयंतीलाल कोठारी यांच्या हस्ते गुरुपूजन तर धनराज कावेडिया यांच्या द्वारे आरती करण्यात आली.
प. पू. डॉ मुनीराज श्री लाभेशविजयजी महाराज यांनी आपले विचार व्यक्त करत प्रवचनात चातुर्मासचे महत्व उपस्थित श्रावकांना समजून सांगितले. या ४ महिन्याचा चातुर्मास काळात रोज प्रवचन, ध्यान, अनेक तप-आराधना शिबीरचे आयोजन श्री जैन श्वेतांबर दादावाडी टेम्पल ट्रस्ट द्वारे आयोजन करण्यात येणार आहे व सर्वांनी नियमित उपस्थित राहावे अशी घोषणा या प्रसंगी करण्यात आली.
विशेष अतिथी चातुर्मास समिती अध्यक्ष विलास राणावत, दीपचंद कटारिया, नितीन कोठारी, तेजराज जैन, आनंदकुमार बोराणा, दादावाडी टेम्पल ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गुंदेशा, सचिव मिठालाल जैन, कोषाध्यक्ष कांतीलाल पालेशा, सुरेश ललवाणी, महेंद्र राठोड, महावीर बाफना, रमेश बोराणा, बालचंद कटारिया, नरेश मेहता व जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री जिनकुशल महिला मंडळ, गोडवाड महिला मंडळ, नूतन महिला मंडळ, महावीर महिला मंडळ, विशाश्रीमती महिला मंडळ, अहिंसा महिला मंडळ, जैन आर्मीयांनी या भव्य मंगल प्रवेश कार्यक्रमात विशेष सहभाग घेतला.
रोज प्रवचन, स्नात्र पूजा, प्रतिक्रमण, तप आराधनाला, शत्रूंजय तप, पार्श्वनाथ प्रभू अर्हम तप, नवकार मंत्र आराधना तपचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संपत जैन व ललित परमार यांनी केले.
