सिंहगड पोलीस ठाण्याच्या हदीत अपघात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे मुंबई बेंगलोर महामार्गावर नऱ्हे नजिक दोन भरधाव ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात एक चालक ठार झाला आहे.
सिंहगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास झाला. जांभूळवाडी पुलाजवळ असलेल्या बोगद्यानाजिक हा अपघात झाला. पुण्यकडे येत असताना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला आहे.
त्यामध्ये डावीकडून धडक देणाऱ्या ट्रकची मोडतोड झाली. यात चालक रावसाहेब सीताराम शिंगारे (वय ४३, रा. टाकळी भान, नेवासा रोड, श्रीरामपूर) यांचा मृत्यू झाला. अपघाताची तक्रार बाबुलाल बिष्णोई (वय ३०, रा. पमाना, जिल्हा साचौर राजस्थान) याने दिली आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त ट्रक बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. हा तपास पोलिस उपनिरीक्षक मोहन देशमुख करीत आहेत.
