लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : भरधाव खासगी बसच्या धडकेने दुचाकीवरील तरुण ठार झाल्याची घटना उबाळे नगर महिंद्रा शो रूमच्या समोर घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात प्रदीप तुकाराम देवकर (वय ४१ वर्षे रा. केसनंद ता. हवेली जि. पुणे.) यांचा मृत्यू झाला आहे. फिर्याद मयत तरुणाच्या आईने लोणीकंद पोलिसात दिली आहे. १३ जुलै रोजी सकाळी हा अपघात झाला. बस चालक फरार झाला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अद्याप अटक झालेली नाही.
