आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बिबवेवाडी जैन स्थानकात चातुर्मासाच्या सहयोगी आणि दानशूर व्यक्तींचा सन्मान

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • September 6, 2024
Spread the love

बिबवेवाडी जैन स्थानकात चातुर्मासाच्या सहयोगी आणि दानशूर व्यक्तींचा सन्मान सोहळा मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडला. केंद्रीय सहकार आणि उड्डाण राज्य मंत्री, मुरलीधर मोहोळ यांच्या शुभ हस्ते मानचिन्ह देऊन सन्मान सत्कार करण्यात आला.

बिबवेवाडी जैन स्थानक, पुणे येथे महाराष्ट्र प्रवर्तिनी श्रमणी सूर्या, प. पु. डॉ. श्री. ज्ञानप्रभाजी म.सा. यांच्या सुशिष्या तपस्वी रत्न प. पु. श्री पुष्पचुलाजी म.सा. आणि अनुशासनप्रिय प. पु. श्री सुप्रियदर्शनाजी म.सा. यांचा चातुर्मास हर्षेउल्हासात सुरू आहे.

सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून आमदार माधुरी मिसाळ, माजी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, माजी नगरसेवक प्रवीण चोरबेले, मनोज छाजेड, ललित जैन, माजी नगरसेवक बाळासाहेब ओसवाल आणि अभय छाजेड यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शोभा धारिवाल, विनोद मांडोत, अशोक नहार, श्रीपाल ओसवाल आणि अविनाश कोठारी यांचा चातुर्मासातील विशेष सहभागाबद्दल प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान सत्कार करण्यात आला. या चातुर्मासाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जैन समाजातील दानशूर व्यक्तींच्या कार्याचे सर्वांनी कौतुक केले.

पर्युषण पर्वाचे शिखर म्हणजे ‘आलोयाना’ रविवार, दि. ८ सप्टेंबर रोजी बिबवेवाडी जैन स्थानकात सकाळी ११ वाजता सुरू करण्यात येईल व संध्याकाळी ६ वाजता प्रतिक्रमण आयोजित केले आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन या प्रसंगी बिबवेवाडी संघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी केले.

या प्रसंगी बिबवेवाडी संघाचे उपाध्यक्ष माणिकचंद दुगड यांनी सूत्र संचालन केले व महामंत्री गणेश ओसवाल यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिबवेवाडी श्री संघाचे अध्यक्ष श्री पोपटलाल ओस्तवाल, माणिक दुगड, पन्नालाल पितळिया, गणेश ओसवाल, लालचंद कर्नावट, अविनाश कोठारी, सुनील बलाई, चंद्रकांत लुंकड, प्रवीण चोरबोले, कीर्तिराज दुगड, प्रकाश गांधी, सुभाष बाफना, संपत भटेवरा, विजय संदडीया, चंपालाल नहार, रामलाल संचेती यांचे बहूमोल योगदान मिळाले.