आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जीतोच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विजय भंडारी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • September 23, 2024
Spread the love

मुंबई : मुंबई येथे पार पडलेल्या जीतोच्या 18व्या वार्षिक सभेत जीतोच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विजय भंडारी यांची तर JATF च्या वार्षिक सभेत इंदर जैन यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

पुणे शहराकडे ही दोन्ही महत्त्वाची पदे आल्यामुळे संपूर्ण जगातील जीतोमध्ये पुण्याचा गौरव वाढला आहे. यापूर्वी कांतिलाल ओसवाल हे जीतोचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर विजय भंडारी यांची या पदावर निवड करण्यात आली. तर कोलकाता येथील विनोद दुगड हे JATF चे चेअरमन होते.

त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर इंदर जैन यांची चेअरमनपदी निवड झाली. जीतोचे चेअरमन म्हणून कार्यरत असलेल्या मुंबई येथील सुखराज नाहर यांचा कार्यकाल संपल्यानंतर मुंबई येथील पृथ्वीराज कोठारी यांची या पदावर निवड झाली.