24 फेऱ्यांत लागणार निकाल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी विधानसभा मतदारसंघ (क्रमांक 246) सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. शनिवारी सकाळपासून सुरू होणारी मतमोजणी 24 फेऱ्यांमध्ये पार पडणार असून, प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 150 कर्मचारी आणि कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार एफ. आर. शेख यांनी माहिती दिली.
मतमोजणीसाठी एकूण 24 फेऱ्या होणार आहेत. यासाठी 14 ईव्हीएम टेबल्स आणि 10 पोस्टल मतपत्रिकांसाठी स्वतंत्र टेबल्स ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलवर तीन प्रमुख कर्मचारी असणार आहेत:मतमोजणीचे पहिले टप्पे वेळखाऊ असल्यामुळे पहिल्या फेरीला साधारणतः 2 तास लागतील. त्यानंतर प्रत्येक पुढील फेरी 30 मिनिटांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
सकाळी 8 वाजता पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू होईल.सकाळी 8.30 वाजता ईव्हीएम मतमोजणीला प्रारंभ होईल.प्रत्येक फेरी पूर्ण झाल्यावर संबंधित निकाल जाहीर केला जाईल.मतमोजणी केंद्रामध्ये कडक सुरक्षा उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. मतमोजणी कक्ष आणि परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली असेल.
अधिकृत ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.मतमोजणी केंद्र आणि परिसरात पोलीस तैनात असतील. मतमोजणीसाठी विशेष नियंत्रण कक्ष कार्यरत असेल. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व उमेदवार, राजकीय पक्ष, आणि जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. “मतमोजणी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडेल आणि निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.