आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

“सन्मान कर्तृत्वाचा” – नवचैतन्य संस्थेचा वर्धापन दिन सोहळा संपन्न

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • December 7, 2024
Spread the love

पुणे : नवचैतन्य सामाजिक संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त “देणे समाजाचे, जगणे आनंदाचे” या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान आणि समाज भूषण व समाज दूत पुरस्कार सोहळा दीपस्तंभ फाउंडेशनच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात नवकार महामंत्राने झाली. उद्घाटन सुनील चोरडिया (संस्थापक, हॅंडीकॅप सेंटर, निगडी) यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी दीपस्तंभ फाउंडेशनचे उपाध्यक्ष राजेश मुनोत होते. प्रा.सुनील धनगर यांनी “देणे समाजाचे, जगणे आनंदाचे” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले.

कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाज भूषण व समाज दूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू रिद्धिका पाटील, माऊली हरकळ (विकास अनाथ आश्रम), भागवत बोराडे (आपुलकी आश्रम) आणि इतर संस्थांचे संस्थापक सन्मानित झाले.

कार्यक्रमातील प्रमुख उपस्थित मान्यवर: यावेळी सुनील चोरडिया, राजेश मुनोत – उपाध्यक्ष, दीपस्तंभ फाउंडेशन, ज्योत्सना मुथा, प्रा. डॉ. अशोक पगारिया, सागर सांकला, सुभाष ललवाणी, राजेंद्र छाजेड, सुनील धनगर, सुभाष रांका, शांतिलाल दुगड, कुंतीलाल शिंगी, सूर्यकांत मुथियान, रमेश कटारिया, संजय छाजेड, राजेंद्र कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा अनिता नहार यांनी केले. कार्यकारिणी सदस्य व इतर सदस्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.