आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

JATF तर्फे विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची उभारणी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • December 20, 2024
Spread the love

पुणे : प्रशासनात अधिकाऱ्यांची संख्या वाढावी यासाठी जीतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग फाउंडेशनच्या JATF च्या वतीने काम सुरू आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करण्यासाठी जैन समाज मुलांसाठी देशातील महत्त्वाच्या शहरात हॉस्टेल, लायब्ररी व इतर सुविधा पुरवल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून पुण्यातील लुल्लानगर भागात या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या JATF पुणे हॉस्टेलचे भूमिपूजन झाले.

जीतो रेस्ट ऑफ महाराष्ट्र JATF च्या वतीने या हॉस्टेलच्या भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जीतो ॲपेक्सचे अध्यक्ष विजय भंडारी, चेअरमन पृथ्वीराज कोठारी, JATF ॲपेक्सचे चेअरमन इंदर जैन, JATF चे अध्यक्ष गौतम जैन,

रेस्ट ऑफ महाराष्ट्र JATF चेअरमन रवींद्र सांकला, सचिव विशाल कोठारी, श्रमन आरोग्यमचे रमेश हरन, जीतो पुणेचे अध्यक्ष इंदर छाजेड, राजेश सांकला, विजयकांत कोठारी, शोभा धारिवाल, राजकुमार चोरडिया, देविचंद जैन, कांतिलाल ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते.


मनीष जैन, डॉ. आश्विन पोरवाल, प्रमोद रांका, सुहास खाबिया, गौरव दुगड, राजकुमार लोढा, नाशिकचे सतीश हिरन, नागपूरचे कैलास गोलेचा हे JATF चे नवीन सदस्य झाल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. रेस्ट ऑफ महाराष्ट्र JATF चे चेअरमन रवींद्र सांकला यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर, सचिव विशाल कोठारी यांनी आभार मानले.

JATF च्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात मोठं काम करण्याची संधी आहे. आणि पुणे नेहमीच शिक्षण क्षेत्रात अग्रेसर राहिले आहे. त्यामुळे JATF चे काम देखील पुण्यात अग्रेसर राहील. अतिशय कमी कालावधीत JATF हॉस्टेल चे काम सुरू होत आहे व ते वर्षाच्या आत पूर्ण देखील होणार आहे. याचा मला विशेष आनंद आहे.” – इंदर जैन (चेअरमन, जेएटीएफ)

JATF मुळे समाजातील हुशार मुलांना प्रशासकीय सेवेत जाण्याची संधी मिळणार आहे. आणि त्यामाध्यमातून ते देशाची सेवा करणार आहेत. शिक्षण म्हटलं की पुणे शहराचे नाव सर्वात पहिल्यांदा येते. JATFचे काम देखील शिक्षणाशी संबंधित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी होत असलेल्या या हॉस्टेलचा अतिशय आनंद आहे. जागतिक दर्जाचे हे हॉस्टेल असेल. आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करताना काहीच कमी पडणार नाही याची यामध्ये पुरेपूर काळजी घेतली आहे. – गौतम जैन (अध्यक्ष, जेएटीएफ)

“JATF चे पुढील 10 वर्षांचे व्हिजन ठरवणे आवश्यक आहे. UPSC, MPSC आणि न्यायाधीश अशा सर्व महत्त्वाच्या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर हॉस्टेल व अभ्यासासाठी पूरक व्यवस्था निर्माण करायची झाल्यास नियोजन आवश्यक आहे. शिक्षण महत्वाचं असून JATF च्या माध्यमातून मोठं काम करता येईल.” – पृथ्वीराज कोठारी (चेअरमन, जीतो ॲपेक्स)

“पुण्यातील JATF हॉस्टेलचे काम येत्या 9 महिन्यात पूर्ण होईल. आणि त्याच्या उद्घाटनावेळी दुसऱ्या हॉस्टेल चे भूमिपूजन होईल. येणाऱ्या काळात अधिकाधिक आपली मुलं अधिकारी होतील असे काम आपल्याला करायचे आहे. JATF च्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात मोठे काम होऊ शकते. एकत्रित येऊन जे होईल ते एकट्याला होणार नाही. त्यामुळे एकत्र येऊन मोठ्या कामाची पायाभरणी करुयात. पूर्वी लोकांकडे जावं लागायचं आता JATF चं काम मोठं झाल्यानं लोक आपल्याकडे येत आहेत. आपली जबाबदारी वाढली आहे.” – विजय भंडारी (अध्यक्ष, जीतो ॲपेक्स)

“गेल्या काही दिवसात प्रचंड मेहनत घेऊन हॉस्टेलसाठी जागा मिळवली आहे. आता निर्धारित वेळेतच हॉस्टेल चे बांधकाम पूर्ण होईल. दर्जेदार, सर्व सुविधा असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्टेल मुलांना मिळेल. अभ्यास, चर्चा, मार्गदर्शन, व्यायाम आदी सर्व बाबी विचारात घेऊन हे हॉस्टेल बांधले जाणार आहे. सर्वांना अभिमान वाटेल अशी ही वास्तू असेल.” – रवींद्र सांकला (चेअरमन, रेस्ट ऑफ महाराष्ट्र जेएटीएफ)