आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ऋषी आनंदवनचा राजस्थानात सन्मान

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • December 20, 2024
Spread the love

पुणे : जयपूर येथे इंदिरा गांधी पंचायती राज संस्थान सभागृहात हडपसर येथील ऋषी आनंदवन या संस्थेचा ग्रीन आयडियल वॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार ऋषी आनंदवनतर्फे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, कार्याध्यक्ष प्रमोद छाजेड यांनी स्वीकारला.

राष्ट्रीय ट्रिमॅन विष्णूजी लांबा यांच्या श्री कल्पतरू संस्थानतर्फे भारतातील पर्यावरणप्रेमी व त्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रमुख संस्थांना ग्रीन आयडियल वॉर्ड कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये हडपसरच्या ऋषी आनंदवनची निवड करण्यात आली.

यावेळी संस्थेला राष्ट्रीय त्रिमूर्तीचे चिन्ह असलेला स्तंभ व मानपत्र सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी उपाध्याय प्रवर प्रवीणऋषीजी म. सा. यांच्या प्रेरणेने पुण्याजवळ हडपसर येथील ऋषी आनंदवन या संस्थेचा सन्मान करण्यात आला.

यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री भगिरथ चौधरी, मदन मेघीवाल, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, तेलंगणाचे राज्यमंत्री संतोषकुमार, राजस्थानच्या शिक्षण मंत्री मंजुला शर्मा, जयपूरचे जिल्हाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.