आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड मुंबई विभागाच्या सल्लागारपदी संजय जैन यांची नियुक्ती

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • December 25, 2024
Spread the love

पुणे : पुणे येथील खांदेश पुत्र संजय चंदनमल जैन यांची केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड मुंबई विभागाच्या सल्लागारपदी नियुक्ती झाल्याबद्दल विविध स्तरांवर कौतुक आणि सन्मान होत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी संजय जैन यांची भारत सरकारच्या सेंट्रल रेल्वे आणि विमानतळ सल्लागार समिती पुणे विभागाच्या सल्लागारपदीही नियुक्ती झाली होती. याशिवाय, त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.