महाराष्ट जैन वार्ता
पुणे: मुंबई-पुणे पंचम झोन जैन कॉन्फरन्सच्या प्रांतीय अध्यक्षपदी नितीन बेदमुथा यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. जैन समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या नितीन बेदमुथा यांनी समाजसेवेची अनेक वर्षांची परंपरा जोपासली आहे.
त्यांच्या निवडीमुळे जैन समाजात उत्साहाचे वातावरण आहे. या यशस्वी निवडीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी महाराष्ट्र जैन वार्ताच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
