प.पू. आप्तवंदनाजी म. सा. यांच्या ३९९ दिवसांच्या मौन साधनेची पुर्णाहुती
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : राष्ट्रसंत आचार्य सम्राट पूज्य श्री आनंदऋषिजी म. सा. यांच्या आशिर्वादाने आणि उपप्रवर्तिनी पूज्य श्री चंदनबालाजी म. सा., बुलंदवाणी पूज्य श्री पद्मावतीजी म. सा. आदी ठाणा यांच्या पवित्र सान्निध्यात आनंद दरबार, कात्रज, दत्तनगर, पुणे येथे दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी मौन साधनेची ३९९ दिवसांची पूर्णाहुती झाली.
चेन्नई निवासी वैराग्यवती कु. चांदनी तातेड यांनी दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी जैन भागवती दीक्षा घेतली होती. त्या वेळी उपाध्याय पूज्य श्री गौतममुनिजी म. सा., आगमज्ञाता डॉ. समकितमुनिजी म. सा., वाणीभूषण पूज्य श्री प्रीतिसुधाजी म. सा. यांच्या सान्निध्यात त्यांचे नामकरण पूज्य श्री आप्तवंदनाजी म. सा. असे करण्यात आले. दीक्षा घेतल्यापासून त्यांनी मौन साधनाव्रत स्वीकारले होते.
आनंद दरबार येथे श्री जैन श्रावक संघाच्या माध्यमातून मौन साधना शिखर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास पूज्य श्री सौरवमुनिजी म. सा., उपप्रवर्तक पूज्य श्री गौरवमुनिजी म. सा., महासतीजी उपप्रवर्तिनी चंदनबालाजी म. सा., तसेच पुण्यस्मिताजी म. सा. उपस्थित होते.
कार्यक्रमात भामाशाह रमणलाल लुंकड, राजेंद्र लुंकड, कोल्हार जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नंदकुमार भटेवरा, महेंद्र कुंकुलोळ, भवरलाल खिंवसरा, विलास मुथा आदी मान्यवर उपस्थित होते. पूज्य श्री आप्तवंदनाजी म. सा. यांना आत्मसाधिका ही पदवी प्रदान करण्यात आली.
लता दुगड व कल्पना संचेती यांनी स्वागतगीते सादर केली. दिलीप संचेती व सुनील गुंदेचा यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी प्रास्ताविक भाषणातून मौन साधनेचे महत्त्व स्पष्ट केले.
वितरागवंदनाजी म. सा., प्रणितीजी म. सा. आणि गौरवमुनिजी म. सा. यांनी मनोगत व्यक्त करत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. विनोद गांधी व विलास मुथा यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. रमणलाल लुंकड, राजेंद्र लुंकड, मनिषा लुंकड कुटुंबाने केशर छाटण्याचा लाभ घेतला, तर तिजाबाई सोभाचंद गांधी परिवाराने मौन साधनेची चादर ओढवण्याचा मान मिळवला. कार्यक्रमाचा समारोप सुभाष पिरगळ यांनी आभार प्रदर्शनाने केला.
