महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : दि पूना मर्चेंट्स चेंबर तर्फे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळातील नव्याने नियुक्त मंत्री, खासदार आणि पुणे शहरातील नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पणन व राजशिष्टाचार राज्यमंत्री जयकुमार रावल, राज्याचे क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे, उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, अल्पसंख्याक राज्यमंत्री माधुरी मिसाळ, जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार चेतन तुपे, हेमंत रासने यांचे सन्मान करण्यात आले. यावेळी मंचावर दि पूना मर्चेंट्स चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार, राजेंद्र बाठिया, अजित बोरा, आशिष दुगड, राजेश शहा, प्रवीण चोरबेले, ईश्वर नहार, उत्तम बाठीया उपस्थित होते.
