आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

खान्देश केसरी “बरसा-दाता” प. पू. गौतममुनीजी आदि ठाणा २ यांचा होळी चातुर्मास

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • January 17, 2025
Spread the love

निगडी : कोथरूड येथील स्थानक भवनात आकुर्डी-निगडी-प्राधिकरण श्री संघाच्या विश्वस्त मंडळाने पूज्य गुरुभगवंतांचे दर्शन, प्रवचन आणि मंगल आशीर्वाद घेत, होळी चातुर्मासासाठी विनंती सादर केली. प. पू. बरसादाता गौतममुनीजी म. सा. यांनी या विनंतीला मान्यता देत होळी चातुर्मास आकुर्डी-निगडी-प्राधिकरण श्री संघाकडे प्रदान करण्याची घोषणा केली.

या प्रसंगी पू. गौतम मुनीजी यांनी आपल्या प्रवचनात अहंकार सोडून विनयशील व शालीन राहण्याचे महत्त्व सांगितले. तसेच पू. चेतन मुनीजी यांनी ज्ञान हेच सर्वात प्रकाशमान असल्याचे सांगत, अधिकाधिक ज्ञान मिळवत जीवन प्रकाशमय करण्याचा सल्ला दिला.

आकुर्डी-निगडी-प्राधिकरणश्री संघाच्या वतीने संघाध्यक्ष सुभाषजी ललवाणी यांनी गुरुचरणी विनंती केली. यावेळी संघाचे उपाध्यक्ष विजयजी गांधी, कोषाध्यक्ष नेनसुखजी मांडोत, महामंत्री राजेंद्रजी छाजेड, माजी अध्यक्ष जवाहरजी मुथा, विश्वस्त पोपटलालजी कर्नावट, सूर्यकांतजी मुथीयान, मोतीलालजी चोरडिया, राजेंद्रजी कटारिया आणि प्रकाशजी मुनोत आदी मान्यवर उपस्थित होते.

कोथरूड श्री संघाचे अध्यक्ष डॉ. रमेशजी लोढा आणि विश्वस्त ईश्वरजी छाजेड यांनी आकुर्डी श्री संघाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.