आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

नितीन ओस्तवाल यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा उपक्रम

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • January 27, 2025
Spread the love

पुणे : नितीन हरकचंदजी ओस्तवाल यांनी आपला ६० वा वाढदिवस समाजसेवेसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरवत साजरा केला. या विशेष प्रसंगी त्यांनी अपंग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्र, वानवडी येथे १२ संच एल्बो क्लच (चालण्यासाठी सहाय्य करणाऱ्या काठ्या) अपंग मुलांना प्रदान करून अनोखा उपक्रम राबवला. लाभार्थी मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद या कार्यक्रमाचे यश अधोरेखित करत होता.

कार्यक्रमात नितीन ओस्तवाल यांच्यासोबत त्यांचे वडील हरकचंदजी ओस्तवाल, पत्नी स्मिता ओस्तवाल, मुलगा सिद्धार्थ ओस्तवाल, आणि सून कोमल ओस्तवाल हे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. तसेच संस्थेचे चेअरमन मुरलीधर कचरे, सचिव जाधव, व प्राचार्या सुतार मॅडम यांची उपस्थिती या उपक्रमाला प्रेरणादायी बनवणारी ठरली.

अपंग मुलांच्या शारीरिक पुनर्वसनासाठी हातभार लावणाऱ्या या उपक्रमाबद्दल स्थानिक पातळीवर तसेच विविध सामाजिक संस्थांकडून प्रशंसा व्यक्त करण्यात येत आहे. नितीन ओस्तवाल यांनी यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेतला आहे. त्यांच्या या कार्याने समाजसेवेची नवी दिशा दाखवली असून, इतरांसाठी ते आदर्श ठरले आहेत.

कार्यक्रमाच्या शेवटी लाभार्थी मुलांनी नितीनजींच्या या समाजोपयोगी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या समाजसेवेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.