आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

G Tribe Experience च्या वतीने महिलांचा दयारा बुग्यल शिखर विजय

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • January 27, 2025
Spread the love

पुणे : G Tribe Experience या कंपनीच्या वतीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील डॉ. अंकिता लोढा आणि 16 महिलांनी 26 जानेवारी 2025 रोजी उत्तराखंडातील दयारा बुग्याल (12,000 फूट) या उंच शिखरावर विजय मिळवला. भारतीय राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा करत त्यांनी अभिमानास्पद कामगिरी केली.

हा विशेष ट्रेक G Tribe Experience च्या पिंपरी-चिंचवड येथील प्रमुख सौ. स्नेहल घेरडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. या मोहिमेचा उद्देश ‘हर शिखर तिरंगा’ या संकल्पनेला प्रोत्साहन देत देशभक्तीचा संदेश देणे हा होता.

या मोहिमेचे यश सर्व सहभागी महिलांच्या जिद्द, साहस आणि देशप्रेमामुळे शक्य झाले. ट्रेकचे सह-नेतृत्व राहुल नेवाळे यांनी केले आणि त्यांनी महिलांना मार्गदर्शन दिले. या यशस्वी मोहिमेसाठी सर्व सहभागी महिलांचे आणि G Tribe Experience टीमचे मनःपूर्वक अभिनंदन!