आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

एनव्हीसीएल क्रिकेट लीग : पीस्क्वेअर अचिव्हर्स चॅम्पियन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Police • January 27, 2025
Spread the love

पुणे : न्यू व्हेंचर क्रिकेट लीग (एनव्हीसीएल) सीझन-01 अंतर्गत झालेल्या अंतिम सामन्यात पीस्क्वेअर अचिव्हर्स (फ्रेश-प्राश ग्रुप) यांनी चॅम्पियन्स किताब पटकावला. उपविजेतेपद थालाज 7 (आरव अग्रवाल) संघाने मिळवले. हा सामना १९ जानेवारी २०२५ रोजी पुण्यात पार पडला.

हा सामना प्रेक्षकांच्या उत्साहपूर्ण प्रतिसादासह पार पडला. अंतिम सामन्यात पीस्क्वेअर अचिव्हर्स संघाने उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळवला. एनव्हीसीएलचे संस्थापक परेश ओस्तवाल, आनंद अग्रवाल आणि जिग्नेश बंबोली यांनी या लीगचे यशस्वी आयोजन केले. विविध क्षेत्रातील व्यावसायिक मित्रांना एकत्र आणून एकसंधता निर्माण करणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.


या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर ऋषभ दुगड (दुगड ग्रुप) होते. अन्य स्पॉन्सर्समध्ये मेडिकल किट स्पॉन्सर उमेश ओस्तवाल (जय हेल्थकेअर), मीडिया पार्टनर अभिजीत डुंगरवाल (महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) आणि डिजिटल पार्टनर नितीन चोपडा (यश क्रिएशन) यांचा समावेश होता. या रोमांचक स्पर्धेने सर्वांना मंत्रमुग्ध केले आणि खेळाडूंच्या कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली.