६२वी रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया नॅशनल स्पर्धा २०२४
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : ध्रुव प्रितेश चोरडिया याने म्हैसूर, कर्नाटक येथे आयोजित ६२वी रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया नॅशनल स्पर्धा २०२४ (वयोगट ७ वर्षांखालील) मध्ये शानदार कामगिरी केली आहे.
६ आणि ७ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या या स्पर्धेत भारतातील २८ राज्यांतील बाल स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ध्रुवने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत १ सुवर्ण पदक (३ लॅप रेस) आणि १ रौप्य पदक (२ लॅप रेस) मिळविले.
ध्रुव चोरडियाला या कामगिरीमुळे राष्ट्रीय चॅम्पियनशिप (RFSI) स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी ध्रुवने जिल्हा आणि राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत प्रत्येकी दोन सुवर्णपदके जिंकली होती.
या स्पर्धा पुणे आणि मुंबई येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या यशस्वी प्रवासात ध्रुवला कै. राहुल राणे सर (LXT), अविनाश बोडके सर (A1 रोलर स्केटिंग क्लब), आणि सिद्धेश सर यांचे मार्गदर्शन लाभले.
