आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आनंद दरबार दत्तनगर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Other, People • January 28, 2025
Spread the love

कार्यक्रमास श्री. चक्रधर स्वामी विद्यालयाच्या कार्याध्यक्ष सुवर्णा कोंढरे, महेंद्रजी कोंढरे, समाजसेवक सूर्यकांत बेलदरे, भरत कवाड, विशाल दुगड, उद्योजक देविदास जाधव उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत आनंद दरबार ट्रस्टींच्या हस्ते करण्यात आले.

आनंद दरबार ट्रस्टी डॉ. अंकिता धोका यांनी ‘गुरु आनंद मेडिकल सेवा’च्या माध्यमातून अल्प दरात गरजू नागरिकांना आरोग्य सेवा पुरवल्याची माहिती दिली. या सेवेमुळे हजारो नागरिक लाभान्वित झाले आहेत.

मानव सेवेच्या अनोख्या उपक्रमासाठी सुवर्णा कोंढरे आणि देविदास जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले.