विद्यार्थ्यांच्या तालावर गुंजला संपूर्ण कॅम्पस : आत्मविश्वास, संघभावना आणि सर्जनशीलतेला चालना
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या बावधन कॅम्पसमध्ये नुकताच रिदमिक गरबा या भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळभर विद्यार्थ्यांच्या नृत्य, ऊर्जा आणि रंगीबेरंगी पोशाखांनी संपूर्ण कॅम्पस उत्सवमय झाला.
कार्यक्रमात सुमारे ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विविध विभागांतील विद्यार्थी – ज्युनिअर कॉलेज, सायबर सिक्युरिटी, फार्मसी, नर्सिंग आदींनी सामूहिक सहभाग नोंदवत आपले नृत्यकौशल्य सादर केले. ताल, तंत्रसाक्षरता आणि ऊर्जा यांच्या सुंदर मिलाफामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
स्पर्धेच्या निकालात एस.सी.एम.आय.आर.टी. ग्रुपच्या १६ विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक पटकावला, तर एम.सी.ए. ग्रुपच्या २४ विद्यार्थ्यांनी दुसरा क्रमांक मिळवला. ज्युनिअर कॉलेजच्या ८० विद्यार्थ्यांनी तिसरा क्रमांक मिळवत आपल्या विभागाचा गौरव वाढवला.
सर्वोत्कृष्ट पोशाख पुरस्कारात महिलांमध्ये कोमल चौधरी तर पुरुषांमध्ये यश वाकीकर ठरले. नृत्यातील जोश व ऊर्जा दाखविल्याबद्दल निखिल पवार, निलेश राठोड आणि युवराज राठोड यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
रिदमिक गरबा हा केवळ सांस्कृतिक सोहळा न ठरता विद्यार्थ्यांना टीमवर्क, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि सर्जनशीलतेचा अनुभव देणारा अविस्मरणीय क्षण ठरला. या उत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद, एकात्मता आणि सांस्कृतिक समृद्धीची भर पडली.
अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि एकतेची भावना वाढते, तसेच सर्वांगीण विकासाला चालना मिळते.” कार्यक्रमाला उपाध्यक्षा सौ. सुषमा चोरडिया, सहाय्यक उपाध्यक्ष सिद्धांत चोरडिया यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांसोबत उत्साहाने साजरा केला. – प्रा. डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
