• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 10, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

निलंबित पोलीस हवालदाराला आंध्र प्रदेशातून अटक

February 10, 2026
0
27 1 26 1
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे नाव सांगून सराफ, महिलांची केली होती फसवणूक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : पोलीस कर्मचारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे नाव सांगून विवाहित महिलांची आणि सराफांची फसवणूक करणाऱ्या निलंबित पोलीस हवालदाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी आंध्र प्रदेशातून अटक केली आहे.

गणेश अशोक जगताप (वय ५२, रा. कावेरीनगर पोलीस वसाहत, वाकड) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. गणेश जगताप याने राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी आपल्या फाईलमधील शिक्षा झालेली पाने काढून टाकून खोटी कागदपत्रे जोडली होती.

२०११ मध्ये सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी जगतापसह दोन लिपिकांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्याने सराफांसह महिलांची फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले होते.

जगताप याच्यावर भारती विद्यापीठ, चतु:श्रृंगी आणि कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी रविवारी दुपारी त्याला ताब्यात घेतले. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पार्लर व्यवसायिक महिलेची अडीच लाखांहून अधिक रोकड तसेच सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने घेऊन त्याने फसवणूक केली होती. पत्नीच्या आजारपणाचा बहाणा करून तसेच मुलीच्या शिक्षणाचे कारण सांगून त्याने ही फसवणूक केली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरून जगताप याच्यावर गुन्हा दाखल केला होता.

याआधीही जगताप याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात एका महिलेचे ७३ तोळे सोने आणि १७ लाख रुपये रोख घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा जुलै महिन्यात दाखल झाला होता. दरम्यान, २१ ऑगस्ट २०२४ रोजी जगताप याची पोलीस मुख्यालयातून विशेष शाखेत बदली करण्यात आली होती.

मात्र, हजर न राहता त्याने यादरम्यान औंध येथील आणखी एका सराफाला गंडा घातला. पुण्यातील औंध भागातील एका सराफी व्यावसायिकाकडून जगताप याने पोलीस दलातील माजी वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव वापरून ८ लाख २२ हजार रुपयांचे दागिने खरेदी केले होते. ही घटना समोर आल्यानंतर विशेष शाखेचे तत्कालीन पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी जगताप याला निलंबित केले होते.

पुजार्‍यांनी फोटो ओळखला अन् हवालदार जाळ्यात – जगताप याला निलंबित केल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल असलेल्या भारती विद्यापीठ, चतु:श्रृंगी आणि कोथरूड पोलीस ठाण्याची पथके त्याच्या मागावर होती. दोन दिवसांपूर्वी भारती विद्यापीठ पोलिसांना जगताप आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील फुलपथरू गावात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात, पोलीस अंमलदार मंगेश गायकवाड यांच्या पथकाने रविवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी जगताप याला ताब्यात घेतले. जगताप हा फुलपथरू गावातील एका भाड्याच्या खोलीत राहत होता. तो त्या गावातील एका मंदिरात अधूनमधून दर्शनाला जात होता. पोलिसांनी गावात पोहोचल्यानंतर त्या मंदिरातील पुजाऱ्याला जगताप याचा फोटो दाखवला. त्यांनी तो ओळखला. त्यावरून तो राहत असलेली खोली पोलिसांना सापडली आणि तेथून त्याला ताब्यात घेण्यात आले.

Feb 202611

Latest Articles

ये स्वादिष्ट चीजें हैं ‘ज़हर’…..आज ही छोड़ दें इन्हें खाना!!

February 10, 2026
JBN ब्लास्टर ग्रुप की मीटिंग में ₹ 16.65 करोड़ का व्यवसाय

JBN ब्लास्टर ग्रुप की मीटिंग में ₹ 16.65 करोड़ का व्यवसाय

February 10, 2026
‘सूर्यदत्त’चे शैक्षणिक, सामाजिक कार्य हा प्रबोधनाचा प्रभावी मार्ग

‘सूर्यदत्त’चे शैक्षणिक, सामाजिक कार्य हा प्रबोधनाचा प्रभावी मार्ग

February 10, 2026
येरवडा पोलीस ठाण्याच्या कोठडीतून आरोपीचे पलायन

येरवडा पोलीस ठाण्याच्या कोठडीतून आरोपीचे पलायन

February 9, 2026
शोरुममधील एक्सॉसमधून शिरून रोकड केली लंपास

शोरुममधील एक्सॉसमधून शिरून रोकड केली लंपास

February 9, 2026
Load More
Previous Post

ये स्वादिष्ट चीजें हैं ‘ज़हर’…..आज ही छोड़ दें इन्हें खाना!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

निलंबित पोलीस हवालदाराला आंध्र प्रदेशातून अटक

निलंबित पोलीस हवालदाराला आंध्र प्रदेशातून अटक

February 10, 2026
‘सूर्यदत्त’चे शैक्षणिक, सामाजिक कार्य हा प्रबोधनाचा प्रभावी मार्ग

‘सूर्यदत्त’चे शैक्षणिक, सामाजिक कार्य हा प्रबोधनाचा प्रभावी मार्ग

February 10, 2026
येरवडा पोलीस ठाण्याच्या कोठडीतून आरोपीचे पलायन

येरवडा पोलीस ठाण्याच्या कोठडीतून आरोपीचे पलायन

February 9, 2026
शोरुममधील एक्सॉसमधून शिरून रोकड केली लंपास

शोरुममधील एक्सॉसमधून शिरून रोकड केली लंपास

February 9, 2026
केअर टेकरने वृद्ध मेजरला १ कोटी ११ लाख रुपयांचा घातला गंडा

उज्जैनच्या महाकाल मंदिरातील महंतांच्या नावाने फसवणूक

February 9, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
निलंबित पोलीस हवालदाराला आंध्र प्रदेशातून अटक

निलंबित पोलीस हवालदाराला आंध्र प्रदेशातून अटक

February 10, 2026

ये स्वादिष्ट चीजें हैं ‘ज़हर’…..आज ही छोड़ दें इन्हें खाना!!

February 10, 2026
JBN ब्लास्टर ग्रुप की मीटिंग में ₹ 16.65 करोड़ का व्यवसाय

JBN ब्लास्टर ग्रुप की मीटिंग में ₹ 16.65 करोड़ का व्यवसाय

February 10, 2026
‘सूर्यदत्त’चे शैक्षणिक, सामाजिक कार्य हा प्रबोधनाचा प्रभावी मार्ग

‘सूर्यदत्त’चे शैक्षणिक, सामाजिक कार्य हा प्रबोधनाचा प्रभावी मार्ग

February 10, 2026
येरवडा पोलीस ठाण्याच्या कोठडीतून आरोपीचे पलायन

येरवडा पोलीस ठाण्याच्या कोठडीतून आरोपीचे पलायन

February 9, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

निलंबित पोलीस हवालदाराला आंध्र प्रदेशातून अटक

निलंबित पोलीस हवालदाराला आंध्र प्रदेशातून अटक

February 10, 2026

ये स्वादिष्ट चीजें हैं ‘ज़हर’…..आज ही छोड़ दें इन्हें खाना!!

February 10, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta