नगराध्यक्षपदी भाजपाच्या आनंदीकाकी चंदुकाका जगताप यांचा दणदणीत विजय
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सासवड नगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत भाजपाने माजी आमदार संजय चंदुकाका जगताप यांच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी करत नगराध्यक्षपदासह १४ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले. आमदार विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणाऱ्या शिवसेनेला ९ जागांवर समाधान मानावे लागले.
भाजपाच्या वतीने आनंदी चंदुकाका जगताप यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक ११,३६२ मतांनी जिंकत घवघवीत यश संपादन केले.सासवड नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपाने सत्ता मिळवली असून, हा विजय पक्षासाठी ऐतिहासिक ठरला आहे.
भाजपाकडून विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत : प्रभाग क्रमांक १ (अ) मधून माधुरी तेजस राऊत (१,२०९), प्रभाग १ (ब) मधून मनोहर ज्ञानोबा जगताप (१,११२), प्रभाग २ (अ) लिना सौरभ लढणे (७५४), तर प्रभाग २ (ब) बाळासाहेब भिंताडे (७५५) यांनी विजय मिळवला.
प्रभाग ३ (अ) मधून शितल प्रवीण भोंडे (१,०१३) आणि प्रभाग ३ (ब) मधून ज्ञानेश्वर माऊलीकाका जगताप (१,०६९) विजयी झाले. प्रभाग ४ मध्ये सोपान एकनाथ रणपिसे (१,४४४), प्रभाग ५ (अ) रत्ना अमोल म्हेत्रे (१,५२१) व प्रभाग ५ (ब) मंदार विजय गिरमे (१,६२७) यांनी मताधिक्य मिळवले.
प्रभाग ६ (अ) मधून अर्चना चंद्रशेखर जगताप (१,४५५) तर प्रभाग ६ (ब) राजनभैय्या चंद्रशेखर जगताप (१,४९०) विजयी झाले. प्रभाग ७ (अ) स्मिता उमेश जगताप (१,४५९) आणि प्रभाग ७ (ब) वैभव बबनराव टकले (१,२७४) यांनी विजय संपादन केला.
प्रभाग ८ (अ) मधून प्रितम पप्पू म्हेत्रे (९७२) तर प्रभाग ८ (ब) दिपाली अक्षराज जगताप (९३४) विजयी झाल्या. प्रभाग ९ (अ) प्रदीप (बंडूशेठ) राऊत (६८४), प्रभाग ९ (ब) प्रियंका साकेत जगताप (९३८), प्रभाग १० (अ) ज्ञानेश्वर गिरमे (९३६), प्रभाग १० (ब) शिल्पा संदीप जगताप (९५४) आणि प्रभाग ११ मधून अजित उर्फ हापूकाका जगताप (१,६६६) मतांनी विजयी झाले.
या निवडणुकीत भाजप व शिवसेना पक्षाचे प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. निकाल जाहीर होताच भाजपाच्या सर्व विजयी उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी जल्लोषात मिरवणुका काढत आनंद साजरा केला. सासवड नगरपालिकेत भाजपाने प्रथमच सत्ता मिळविल्याने शहराच्या राजकारणात नवे पर्व सुरू झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
















