गोवंशीची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई : ७ आरोपी अटकेत
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सोलापूर ग्रामीण : मोहोळ पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण पोलिसांनी गोवंशीची अवैध तस्करी व वाहतूक करणाऱ्या संघटित टोळीवर कठोर कारवाई करत सात आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीवर मोठा आघात बसला आहे.
मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत गोवंशाची अवैध तस्करी व वाहतूक करणाऱ्या गुन्ह्यांचे प्रकार वाढल्याने, हे गुन्हे उघडकीस आणून त्यांना प्रतिबंध करण्याबाबत अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व प्रितम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे, मोहोळ पोलीस ठाणे यांना आदेश दिले होते.
त्यानुसार वेगवेगळी पथके तयार करून कारवाई राबविण्यात आली. दि. ०५ जुलै २०२५ रोजी दुपारी ३.३० ते ४.३० वाजण्याच्या सुमारास मौने नरखेड, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथे फिर्यादी हे गोमांस वाहतूक करणारी गाडी पकडण्यास गेले असता, आरोपींनी त्यांना अडवून शिवीगाळ, दमदाटी करत “गोमांस वाहतुकीची माहिती का देतोस” असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७४४/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १८९(१)(२), १९१(२), १९०, ३५२, ३५१(२)(३), ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५, ३७(१)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपींवर यापूर्वीही अशाच स्वरूपाचे २६ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी व त्यांच्या साथीदारांनी बेकायदेशीर मार्गाने आर्थिक लाभ मिळवण्यासाठी संघटित टोळीच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्ये करून समाजात दहशत निर्माण केली होती.
प्राणी संरक्षणासाठी काम करणाऱ्या संघटना व नागरिकांना धमकावणे, मारहाण करणे अशा घटनांमुळे नागरिक भयभीत झाले होते. nआरोपींच्या सततच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे सदर गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १११(२)(ब), १११(३), १११(४) प्रमाणे कलमवाढ करण्यात आली आहे.
सदर कारवाई सोलापुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय केसरकर, पोहेकॉ अविनाश पाटील, रहीमान शेख, दयानंद हेंबाडे, पोकॉ सतिश रूपनर, अमोल जगताप, स्वप्निल कुबेर, संदीप सावंत, योगेश खलाटे व पोकॉ सुनील पवार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
दि. १२ जानेवारी २०२६ रोजी खालील आरोपींना अटक करण्यात आली आहे –
दानिश लियाकत कुरेशी (वय २५)
महमदअली लियाकत कुरेशी (वय २४)
शहाबान अबुतालीब कुरेशी (वय २७)
तौफिक अबुतालीब कुरेशी (वय ३२)
इरफान इकबाल कुरेशी (वय २७)
दस्तगीर कोंडाजी कुरेशी (वय २५)
अरबान अफजल कुरेशी (वय २५)
(सर्व रा. कुरेशी गल्ली, मोहोळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर)


















