आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

औंध-बाणेरमध्ये मेगा रक्तदान शिबिरात ८५१ जणांनी केले रक्तदान

Spread the love

​​पुणे : औंध-बाणेर-बालेवाडी-पाषाण-पिंपळे निलख जैन सकल संघ (ABBPPJSS) आणि ऋषभदेव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे मेगा रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या उपक्रमात तब्बल ८५१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.

भगवान महावीर जन्मकल्याणक, श्रीरामनवमी आणि जागतिक आरोग्यदिन या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून मानवतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असलेल्या औंध-बाणेर-बालेवाडी-पाषाण-पिंपळे निलख जैन सकल संघ (ABBPPJSS) आणि ऋषभदेव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी बाणेर येथील माऊली गार्डन येथे दुसऱ्या मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक सनीजी निम्हण यांच्या हस्ते पार पडले. सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान झालेल्या या शिबिरामध्ये सर्व धर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत ८५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून लक्षणीय प्रतिसाद दिला.

याबद्दल रक्तदान शिबिराचे मुख्य संयोजक सुनील नहार व सचिन नहार यांनी आनंद व समाधान व्यक्त केले आहे. या भव्य रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी ऋषभदेव फाउंडेशन आणि ABBPPJSS चे सचिन नहार, रमणलाल लुंकड यांच्यासह भरत बोरा, नितीन बांठिया, अमित कुदळे, संतोष शिंगवी, परेश गुगळे, आनंद कांकरिया, अमित संचेती, दिपेश भटेवरा, स्वाती नहार, राजश्री बोरा, सपना जैन, सारिका ओसवाल, पूजा भटेवरा, योगिता झांबड, सरला जैन, पारस कटारिया, राहुल छाजेड, धीरज कोठारी, आदित्य गादिया व सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
अनेक तरुण आणि महिलांनी प्रथमच रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात आपला सहभाग नोंदवला.

सकाळपासूनच रक्तदात्यांच्या रांगा लागल्या होत्या. शिबिराच्या ठिकाणी स्वच्छता, अल्पोपहार आणि प्रमाणपत्र वाटपाचे चोख नियोजन करण्यात आले होते. गौतम नाबरीया हे गौतम लब्धी फाउंडेशनचे अनुभवी कार्यकर्ते असून, गेल्या २५ वर्षांपासून ते पुण्यातील सर्व रक्तपेढ्यांसोबत कार्यरत आहेत. त्यांच्या या दांडग्या अनुभवामुळे याही वर्षी शिबिराच्या यशामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

या शिबिराप्रसंगी विलास राठोड – अध्यक्ष पुणे जिल्हा सकल जैन संघ, इंद्रकुमार छाजेड – चेअरमन जितो पुणे, लक्ष्मीकांत खाबिया – सेक्रेटरी जितो पुणे, अभय छाजेड – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस, सुभाष ललवाणी, रवी जैन, राजेंद्र मुथा, आनंद छाजेड, सागर सांखला, नितिन संकलेचा, महावीर नहार, नितीन बेदमुथा, राजेंद्र मुनोत, रमेश कटारिया, गौतम निधी सेंट्रल कमिटीचे सर्व पदाधिकारी, तसेच या भागातील नगरसेवक सनी निम्हण, सपना छाजेड, भक्ति गायकवाड, परशुराम वाडेकर, अमोल बालवडकर, बाबुराव चांदेरे, रोहिणी चिमटे, मयूरी कोकाटे तसेच राहूल बालवडकर, मनोज बालवडकर यांचीही उल्लेखनीय उपस्थिती होती.

“रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा झालेली वाढ ही लोकांच्या वाढत्या जागरूकतेचे प्रतीक आहे. ८५१ बाटल्या रक्त संकलित करून आम्ही केवळ आकडा गाठला नाही, तर शेकडो रुग्णांना जीवनदान देण्यासाठी हातभार लावला आहे,” असे मत आयोजकांनी व्यक्त केले.

या भव्य रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी ऋषभदेव फाउंडेशन आणि ABBPPJSS चे सचिन नहार यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.