आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कोंढव्यात भगवान महावीर जन्मकल्याणकानिमित्त भव्य मिरवणूक

Spread the love

पुणे : कोंढवा सकल जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित भव्य मिरवणुकीत अनेक साधुसंतांच्या उपस्थितीत जैन बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

मिरवणुकीत भगवान महावीरांच्या जीवनावर आधारित आकर्षक देखावे सादर करण्यात आले होते. पारंपरिक वेशभूषा, घोषवाक्ये आणि धार्मिक वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. विविध सामाजिक संदेश देत शांतता, अहिंसा आणि सद्भावनेचा प्रभावी प्रचार करण्यात आला. या कार्यक्रमामुळे कोंढवा परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.