आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सीए सुहास बोरा यांना पीएच.डी. पदवी प्रदान

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 30, 2026
Spread the love

पुणे : विश्‍वकर्मा विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने सुहास प्रेमसुख बोरा यांना व्यवस्थापन विषयातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D.) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या कुलगुरू, प्र-कुलगुरू, व्यवस्थापन मंडळ आणि शैक्षणिक परिषदेच्या शिफारशीनुसार त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.

सुहास बोरा यांनी ‘A Longitudinal Study of Financing Pattern and Financial Performance of Select Jewellers in Pune’ या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता.

पुण्यातील निवडक ज्वेलर्सच्या वित्तपुरवठ्याच्या पद्धती आणि आर्थिक कामगिरीचा दीर्घकालीन अभ्यास या विषयावर त्यांनी सखोल संशोधन केले.

त्यांनी सादर केलेला संशोधन प्रबंध यशस्वीरीत्या पूर्ण करून त्याचा बचाव (Thesis Defence) केला. त्यानंतर विद्यापीठाने त्यांना व्यवस्थापन विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान केली.

९ ऑक्टोबर २०२६ रोजी ही पदवी प्रदान करण्यात आल्याचे प्रमाणपत्रात नमूद आहे. या शैक्षणिक यशाबद्दल सुहास बोरा यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.