संतोष जैन भाजपा पुणे व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष
20 वर्षाच्या समाजसेवेला मिळाली नवी जबाबदारी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : समाजसेवा, व्यापारी हित आणि संघटनात्मक कार्यात गेल्या २० वर्षांपासून सक्रियपणे कार्यरत असलेल्या संतोष जैन यांची भाजपा व्यापारी आघाडी, पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड झाल्याने समाज व व्यापारी क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संतोष जैन यांनी आपल्या समर्पण, दूरदृष्टी आणि जनसंपर्काच्या माध्यमातून समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सामाजिक, धार्मिक तसेच व्यापारी वर्गाच्या हितासाठी सातत्याने केलेल्या कार्याची ही महत्त्वपूर्ण जबाबदारी म्हणजे त्यांच्या उत्कृष्ट कार्याची एक प्रकारे मिळालेली “पावती” मानली जात आहे.
संतोष जैन हे नेहमीच समाजाला सोबत घेऊन चालणारे, लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी तत्पर असणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. व्यापारी वर्गाचा आवाज प्रभावीपणे मांडण्याबरोबरच त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय योगदान दिले आहे.
त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि सकारात्मक नेतृत्वामुळे समाजातील सर्व स्तरांमध्ये त्यांना विशेष मान-सन्मान प्राप्त झाला आहे.
भाजपच्या “सेवा, सुशासन आणि समर्पण” या विचारांना पुढे नेत संतोष जैन यांची झालेली ही निवड संघटनेसाठीही एक मजबूत पाऊल मानली जात आहे.
यावेळी सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी संतोष जैन यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेला नवी ऊर्जा, अधिक बळकटी आणि व्यापक जनसमर्थन मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
