आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अमोल डिसले भाजप युवा मोर्चा बार्शी शहराध्यक्षपदी, राजेश रुणवाल उपाध्यक्ष

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 20, 2026
Spread the love

बार्शी : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा बार्शी शहराच्या पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, बार्शी शहर मंडल अध्यक्षपदी अमोल डिसले तर उपाध्यक्षपदी राजेश रुणवाल यांची निवड करण्यात आली आहे. बार्शीत आयोजित करण्यात आलेल्या “युवाशक्ती जागर मोर्चा” कार्यक्रमात या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

यावेळी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

तसेच सोलापूर जिल्हा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष रणवीर राऊत हे प्रमुख उपस्थितीत होते. अलीकडील निवडणुकांमध्ये संबंधित कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रभावी कामगिरीची दखल घेत त्यांना विविध पदांवर संधी देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना निवडीचे प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. या निवडींमध्ये बार्शी शहर मंडल अध्यक्षपदी अमोल डिसले, उपाध्यक्षपदी राजेश रुणवाल, चिटणीसपदी ऋषिकेश कदम, सरचिटणीसपदी केदार पवार आणि प्रसिद्धीप्रमुखपदी समर्थ तुपे यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच चिटणीस म्हणून आदिराज यादव, विजय साठे, ओंकार भंडारे, सूरज धुमाळ आणि संकेत निकम यांची नियुक्ती करण्यात आली.

उपाध्यक्षपदी अभिषेक वाघमोडे, निलेश सदाफुले आणि अमोल पवार यांची निवड झाली असून, सरचिटणीसपदी महेश गोरे तर कोषाध्यक्षपदी अजय चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत युवकांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सक्रियपणे कार्य करावे, असे आवाहन केले.