आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दुर्मिळ प्रजातीची तस्करी करणारे दोघे जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 21, 2026
Spread the love

पुणे : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पुणे विभागाने पुणे रेल्वे स्थानकाजवळ दुर्मिळ प्रजातींची तस्करी करणाऱ्या दोघांना पकडले. त्यांच्याकडून ३ शेकरू आणि ७ इंडियन स्टार कासव जप्त करण्यात आले आहेत.

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पुणे विभागाला वन्यजीव प्रजातींची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पाळत ठेवली होती. पुणे रेल्वे स्थानकाजवळ त्यांनी एका व्यक्तीला अडवून त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडील दोन पुठ्ठ्याच्या खोक्यांमध्ये लपवून ठेवलेले तीन जिवंत शेकरू आढळून आले. ते जप्त करण्यात आले.

त्यानंतर केलेल्या चौकशीत आणखी एका तस्करीची माहिती मिळाली. त्या ठिकाणी एका व्यक्तीकडून सात जिवंत इंडियन स्टार कासव जप्त करण्यात आली आहेत.

मलबार जायंट स्क्विरल आणि इंडियन स्टार टॉर्टॉईज या दोन्ही प्रजातींचा समावेश वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत अनुसूची-१ मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची शिकार करणे, त्यांना ताब्यात बाळगणे, त्यांची वाहतूक करणे आणि त्यांचा व्यापार करणे या सर्व बाबींवर पूर्णपणे बंदी आहे.

जप्त करण्यात आलेले वन्यजीव, तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही व्यक्ती आणि वन्यजीवांना लपवण्यासाठी वापरण्यात आलेले पॅकिंग साहित्य पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुणे येथील वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.