आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजमध्ये गौरव

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 22, 2026
Spread the love

पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचालित सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या वतीने बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पदके तसेच मेरिट स्कॉलरशिप देऊन गौरविण्यात आले.

‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा तथा सचिव सुषमा एस. चोरडिया आणि सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलेखा यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

प्राचार्या डॉ. किरण राव यांनी विद्यार्थ्यांच्या जिद्द, परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचे कौतुक करत उत्कृष्ट निकालाबद्दल शुभेच्छा दिल्या.

यंदाही महाविद्यालयाने उल्लेखनीय निकालाची परंपरा कायम राखत अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले. विज्ञान शाखेत तन्मय अनिकेत जहागीरदार (८९.६७ टक्के), ईशिता समीर पाटील (८८.१७ टक्के), ऋतुजा प्रताप मगर (८८ टक्के), कानन अजय मत्तानी (८७.६७ टक्के) आणि दिव्या प्रकाश भरेकर (८६.३३ टक्के) यांचा गौरव करण्यात आला.

वाणिज्य शाखेत वरुण हर्षद जहागीरदार (८९.६७ टक्के), दिलीप सावराम सोलंकी (८५.६७ टक्के), ऋषभ अरविंद चौहान (८४.३३ टक्के), सलोनी चेतन चौधरी (८३ टक्के) आणि अनुश्री योगेश भानू (८२.६७ टक्के) यांनी विशेष यश मिळवले.

कला शाखेत गौरी विवेक देशपांडे (८९.८३ टक्के), अमूल्य लक्ष्मण सोनार (८२.६७ टक्के), निशी संजय मवाडिया (८१.६७ टक्के), चैतन्य संजय चौहान (७०.६७ टक्के) आणि गौरी प्रविण धांडे (६७.८३ टक्के) यांचा सत्कार करण्यात आला.

व्यावसायिक अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) विभागात एलिजा मेनेझेस (६९.६७ टक्के), ओम अमोल शिंदे आणि जय ऋषिकेश रेळेकर (६७.३३ टक्के), अजय बाळासाहेब नागरे (६४ टक्के) तसेच संग्राम गोपाळ कुटे (६०.१७ टक्के) यांनी यश संपादन केले.

विज्ञान शाखेतील दिव्या प्रकाश भरेकर हिने गणित आणि सांख्यिकी विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवल्याबद्दल तिचा विशेष सन्मान करण्यात आला.

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्हे, पदके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांनी कॉलेजमधील शैक्षणिक वातावरण, शिक्षक-विद्यार्थ्यांमधील जिव्हाळ्याचे नाते आणि व्यक्तिमत्त्व विकासावर दिल्या जाणाऱ्या विशेष भराचे कौतुक केले.

सर्जनशील उपक्रम, सहशालेय उपक्रम आणि विविध स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला मोठा फायदा होत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.