पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांची एटीएसला बदली
हिम्मत जाधव यांच्याकडे अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स : शिवाजी पवारांकडे महामार्ग सुरक्षा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : राज्यातील पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गेल्या आठवड्यात बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, हिम्मत जाधव आणि डॉ. शिवाजी पवार यांना पुण्यातील विविध विभागांमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे.
पोलीस अधिकारी : सध्याचे पद (बदलीचे ठिकाण) – नवीन नियुक्तीचे ठिकाण
संभाजी कदम (पोलीस अधीक्षक, सीआयडी) – पोलीस अधीक्षक, दहशतवादविरोधी पथक
हिम्मत जाधव (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर) – अपर पोलीस अधीक्षक, अमली पदार्थविरोधी टास्क फोर्स, पुणे
डॉ. शिवाजी पवार (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर) – पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, पुणे
विक्रांत देशमुख (पोलीस उपायुक्त, मिरा-भाईंदर वसई-विरार) – पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड
संजय सरगौडा पाटील (पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड) – पोलीस उपायुक्त, मिरा-भाईंदर वसई-विरार
रमेश चोपडे (पोलीस उपायुक्त, सागरी सुरक्षा, मुंबई) – पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड
विवेक पाटील (प्रतीक्षेत) – पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
अमोल झेंडे (पोलीस अधीक्षक, दक्षता अधिकारी, पीएमआरडीए) – पोलीस उपायुक्त, मिरा-भाईंदर वसई-विरार
विवेक पानसरे (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर) – पोलीस उपायुक्त, ठाणे शहर
अमरसिंह जाधव (पोलीस उपायुक्त, ठाणे शहर) – पोलीस अधीक्षक, डायल ११२, नवी मुंबई
