आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सराईत गुन्हेगाराकडून २ पिस्टल, २ काडतुसे जप्त

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 27, 2026
Spread the love

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे आणि अभिनय चौधरी यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, मांगडेवाडी येथील सुंदरनगर परिसरात एक व्यक्ती अग्निशस्त्र घेऊन थांबली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुंदरनगर येथे धाव घेतली.

गुरुदत्त मित्र मंडळाजवळील मोकळ्या जागेत एक संशयित व्यक्ती उभी असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांना पाहताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तो कमरेच्या मागील बाजूस हात घालून काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करत उडवाउडवीची उत्तरे देत होता.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून १ लाख रुपये किमतीची दोन गावठी बनावटीची पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील पुढील तपास करत आहेत.