आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भारतीय प्रज्ञा शोध परीक्षेत भूमची स्वानंदी महामुनी जिल्ह्यात प्रथम

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 27, 2026
Spread the love

भुम : भारतीय प्रज्ञा शोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत श्री गुरुदेव दत्त प्राथमिक विद्यामंदिर, भूम येथील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी स्वानंदी हारिभाऊ महामुनी हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून शाळेसह भूम शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

अत्यंत कमी वयात मिळविलेल्या या यशामुळे सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. आपल्या बुद्धिमत्ता, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर स्वानंदी हिने हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांनी लहान वयापासून अभ्यासाची आवड आणि चिकाटी जोपासल्यास मोठे यश मिळविता येते, हे स्वानंदीच्या यशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. तिच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.